शब्दक्रीडा दालन

Wiktionary कडून

शब्दक्रीडा दालन आहे तुमचे स्वतःचे, याला कसे सजवायचे ते तुम्ही स्वतः सुचवायचे आणि घडवायचे. खाली काही स्पर्धा दिल्या आहेत त्यात तर भाग घ्याच अजून काही स्पर्धा सुचल्या तर त्याही अवश्य सुरू करा.आपले शब्द[[चौकटी कंसात]]लिहून जतन करावेत म्हणजे संबधीत शब्द सर्व पृष्ठे यादीतअसल्याचे लक्षात येते अथवा पाहिजे असलेले लेख यादीत् नमूद होऊन विक्शनरीच्या कामात मदत होते.आपल्या सहभागा बद्दल धन्यवाद

अनुक्रमणिका

[संपादन] नाट्यछटा/संभाषण

मराठी माणसाच्य दैनंदिन बोलण्यात येणारी वाक्ये/ शब्द संग्रहित व्हावीत असा उद्देश आहे. तुम्ही लिहिण्याच्या दिवशीच वापरलेले/ऐकलेले वाक्य पण वाचणार्‍याला थोडी नाट्यमय वाटेल अशा पद्धतीने लिहावे. दुसर्‍यां‍यानी लिहीलेली संभाषणे तुम्ही बदलू शकता. पात्रांची नावे काल्पनिक चालू शकतील. सुरुवात मायबोलीवर लिहिलेल्या एका विनोदाने करत आहे.

नव्वदीतले जांबुवंतराव जमदग्नी मृत्युशय्येवर होते. गेली ४० वर्षे त्यांच्यावतीने प्रॉपर्टीचा खटला लढवलेल्या ऍडव्होकेट आडदांडांना त्यांनी बोलावून घेतले. खोल गेलेल्या आवाजात त्यांनी विचारले,

जांबुवंतराव जमदग्नी : मला वकील व्हायचंय. काय करावं लागेल?

ऍडव्होकेट आडदांड : अहो, पण, एकदम अचानक हे काय मनात खूळ भरलंय तुमच्या?

जांबुवंतराव जमदग्नी : ते मी तुम्हाला नंतर सांगेन. पण, मला वकिलीची डिग्री हवी आहे. ताबडतोब. एखाद्या फोकनाड युनिव्हसिर्टीतून ती विकत घ्यावी लागली तरी चालेल. मी हवे तेवढे पैसे देईन तिच्यासाठी.

आडदांड वकिलांनी ५० हजार रुपये मोजून जांबुवंतांच्या नावाची खस्मानिया विद्यापीठाची डिग्री मिळवली. ती डिग्री पाहताक्षणी जांबुवंतरावांचा चेहरा आनंदाने खुलला. त्यावर अतीव समाधान पसरले. पाठोपाठ लगेच त्यांना खोकल्याची भयानक उबळ आली, ते तळमळू लागले. आता त्यांचा अंत जवळ आलाय, हे ओळखून आडदांड पुढे सरसावले. त्यांनी विचारले,

ऍडव्होकेट आडदांड :जांबुवंतराव, तुम्ही मृत्यू इतका समीप आलेला असताना वकील का बनलात इतक्या तातडीनं?

जांबुवंतरावांच्या शेवटच्या श्वासातून घरघरत अखेरचे शब्द बाहेर पडले,

जांबुवंतराव जमदग्नी : जगातून एकतरी वकील नष्ट करण्याचा तोच मार्ग होता...

Sutarrn ११:३९, ८ जून २००८ (UTC)राजेश सुतार=मराठी शब्द अंताक्षरी ==

मराठी शब्दाच्या अंताक्षरापासून दुसरा शब्द सुचवत जाणे एवढं सोपे आहे, शक्य तिथे शब्द ज्या वाक्प्रचारात, म्हणीत, कवितेत, "गाण्यात",किंवा एखाद्या बातमीचा विकिदुवा किंवा बाह्यदुवा द्यायचा आहे. स्पर्धेचा विजेता कसा ठरवावा ते तुम्हीच सुचवा.

[संपादन] अक्षर वाढवा स्पर्धा

सदस्याने कोणतेही एक अक्षर घेऊन त्याच्या पुढे किंवा मागे एक-एक अक्षर/जोडाक्षर वाढवत जायचे ,अशा पद्धतीने तयार होणार्‍या शब्दांचा विक्शनरी लेख नसेल तर नवीन चालू करायचा, आधीच असेल तर त्यात काहीतरी सुधारणा/भर करावयाची. जे सदस्य सर्वाधिक मराठी विक्शनरीत शब्द एका ओळीत बनवतील त्यांना वेळोवेळी योग्य (*तयार करून हवे आहे.)विक्शनरी निशाण बहाल केले जाईल.मागे पुढे शब्द नसल्यामुळे ओळ अडली तर तयार झालेल्या शब्दातील किमान एक किंवा अधिक अक्षर घेऊन त्यांना पुन्हा एक-एक अक्षर जोडत ओळ पुढे सुरू ठेवता येईल.

उदा.

Mahitgar 11:23, 6 December 2006 (UTC)

Uday1005 ११:३४, १३ जून २००८ (UTC) -जप-जपान-पान-मानपान-मान-मानव

  • सदस्य नोंदणी करून स्पर्धा प्रस्ताव चालू करताना ~ ही खूण चारदा म्हणजे ~~~~ अशी लिहिण्यास विसरू नये म्हणजे तुमचे नाव स्पर्धेत आपोआप नोंदवले जाईल.

[संपादन] शब्द निर्मिती (अमृतमंथन) स्पर्धा

यात नियम वर दिलेल्या अक्षर वाढवा स्पर्धेप्रमाणेच आहेत फक्त यात मराठीत सध्या नाही अशा मराठी शब्दाची निर्मिती किंवा परभाषी शब्द देवनागरी/मराठीत लिहून त्याचे उपसर्ग किंवा प्रत्यये जोडून संधी किंवा इतर मराठी शब्दाशी समास करून नवीन शब्दाचे मराठीकरण करावयाचे आहे. या स्पर्धेचा मुख्य उद्देश मनोरंजन आहे त्यामुळे ,खाणेबल,पळींग अशीही शब्द निर्मिती सुद्धा चालू शकेल मात्र अशा शब्दांचे लगेच लेख बनवणे टाळा कारण किंवा लेख बनवणार असाल तर त्या नवीन लेखाच्या मथळ्यात सहज दृष्टोत्पत्तीस येईल असे नमूद करा. अर्थात या स्पर्धेचे निकाल वेळोवेळी पोलिंगद्वारा मत अजमावणीने होतील. नवीन शब्दाकरता तुम्हाला अभिप्रेत असलेला अर्थ सोबत गोल कंसात द्या.

[संपादन] शब्दकोडी

  • ही शब्दकोडी तुम्ही विचारा आणि इतरांकडून उत्तरे मागवा.
    • Give English Synonyms for Marathi word recently appeared in news.
      • गोजिरी
    • Give Marathi Synonym words in bold and complete the sentence again
      • मेलोड्रॅमॅटिक चित्रपटापासून माहितीपटापर्यंत बर्‍याच प्रकारांच्या शक्‍यता दिसत असताना "काबूल एक्‍स्प्रेस'चा दिग्दर्शक कबीर खान याने मात्र प्रकार निवडला आहे तो ब्लॅक कॉमेडी चा![1]

[संपादन] हेसुद्धा पहा

वैयक्‍तिक साधने