अट

Wiktionary कडून

{{=मराठी=}

  • शब्दार्थ :
  1. अडचण.
  2. हरकत.
  3. गाडीच्या चाकाखाली ते घरंगळू नये म्हणून जो धोंडा लावतात किंवा ठेवतात तो.
  4. हेकटपणा,हट्ट.
  5. शर्त.
  6. सारंगी,वीणा,वगैरे चे तंतू ज्या घोडीवरून किंवा पट्टीवरून नेलेले असतात ती.
  7. मोट वगैरे थांबल्यावर पूर्वीच्या मोटेतील पाणी जे अजून वाहत असते ते.
  8. जड पदार्थ जागेवरून हलविण्यासाठी किंवा सरकवण्यासाठी तिच्या खाली जी काठी घालतात ती;तरफ.
  9. कोष्ट्याच्या मागातले एक महत्त्वाचे हत्यार.
  10. बैदुलांच्या खेळात बैदुल ज्या बोटाने माराक्याचा त्याला निश्चल आधार मिळावा म्हणून त्या हाताचा अंगठा जमिनीवर टेकतात तो.

अधिक माहिती :

  1. अटकर - (विशेषण) हट्टी, अटीतटी घालणारा,हेकेखोर.
  2. अटीस पेटणे - हट्टास पेटणे, इरेस चढणे;येणे.
  3. अटीचा खेळ - काहीतरी शर्त लावून खेळावयाचा खेळ.
  4. अटीची चाकरी -काही विशिष्ट शर्तीवर केलेली किंवा करावयाची नोकरी.
  5. अटीचा करार/अटीची बोली - उभय पक्षांनी ज्याला मान्यता दिली आहे असा ठराव किंवा व्यवहार.
  • समानार्थी शब्द :

संदर्भ[संपादन]

सरस्वती शब्दकोश, कोशकार - कै.विद्याधर वामन भिडे. अट on Wikipedia.Wikipedia