आटणे

Wiktionary कडून
मराठी शब्द ( हा शब्द मराठी भाषेत वापरात येतो)


• शब्दाची माहिती
  • शब्दार्थ :
  1. उष्णतेने घट्ट होणे.( याच पद्धतीने दुधापासून बासुंदी बनवतात)
  2. लांबीरुंदीने कमी होणे,आखूड होणे. (धुतल्यावर कापड चोपड वगैरे)
  3. कमी होणे( झऱ्याचे,विहिरीचे वगैरे पाणी ) वाळणे,कोरडे पडणे.
  4. संपणे,कमी होणे,खलास होणे.(धान्याचा साठा वगैरे)
  5. वितळविणे.( सोने वगैरे) [सोने इ. वितळवणे ह्या अर्थाने 'अटणे' हे क्रियापद योजिले जाते पण तो अशुद्ध उपयोग होय.]
  • अधिक माहिती :
  1. अटता काळ अटता पाया - अपकर्षाचा काळ उतरती कळा.
  • समानार्थी शब्द : अटणे.

संदर्भ[संपादन]

सरस्वती शब्दकोश, कोशकार - कै.विद्याधर वामन भिडे. आटणे on Wikipedia.Wikipedia