चर्चा:मेळा

Page contents not supported in other languages.
Wiktionary कडून

संबंधित[संपादन]

माझ्या मते संबंधीत हा शब्द संबंधित असा लिहावा. संदर्भ शुद्धलेखनाचे नियम#नियम चौदा Amit (अमित) 00:25, 9 जानेवारी 2007 (UTC)

धन्यवाद अमित,मी अरूण फडकेंचा लेखनकोश अन्वये संबंधित (विशेषण) हे लेखन बरोबर ; शबदयोगी अव्ययात 'संबंधी' धी दीर्घ येतो.

Mahitgar 05:11, 9 जानेवारी 2007 (UTC)

इतर काही सूचना[संपादन]

मूळ शब्द सुचविलेला शब्द संदर्भ
म्हणुन म्हणून शोध चालू
निर्मीत निर्मित शोध चालू
व्यूत्पत्ती व्युत्पत्ति शोध चालू
देशिय देशीय शोध चालू
लिखीत लिखित शोध चालू
विशीष्ट विशिष्ट शोध चालू

Amit (अमित) 02:14, 11 जानेवारी 2007 (UTC)

माझ्या कन्नड भाषेच्या ज्ञानाप्रमाणे मेळा (ಮೇಳಾ) असे लिहीतात. (ಮೇಳ) चा उच्चार 'मेळ' असा होतो. Amit (अमित) 04:11, 13 जानेवारी 2007 (UTC) ः शक्य आहे. पण गूगलवर (ಮೇಳ) चे सर्च अधिक दिसतात पुन्हा एकदा निश्चित करून बदल करावा असे वाटते. Mahitgar 07:30, 13 जानेवारी 2007 (UTC)

गूगल शोधप्रमाणे ಮೇಳ हा शब्द बरोबर आहे असे दिसते (संदर्भ: http://vishvakannada.com/node/54: ಪುಸ್ತಕ ಮೇಳ (उच्चार: 'पुस्तक मेळ' -- मे दीर्घ अथवा मॆ) म्हणजे मराठीत 'पुस्तक मेळा'). पण ಮೇಳ चा उच्चार 'मेळ' आहे हे नक्की (अचूकपणे सांगायचे झाल्यास मेळ मधील मे हा दीर्घ आहे. कन्नडमध्ये इकार आणि उकाराप्रमाणे एकार आणि ओकारही ऱ्हस्व आणि दीर्घ असतात). त्यामुळे मेळ असा उच्चारात बदल करावा अशी सूचना. Amit (अमित) 21:33, 13 जानेवारी 2007 (UTC)
  • अमित धन्यभाद! कन्नड उच्चार देवनागरीत मेळा ऐवजी मेळ असा बदलला.

Mahitgar 05:29, 14 जानेवारी 2007 (UTC)