Jump to content

विक्शनरी चर्चा:मराठी विक्शनरी प्रकल्प पाने

Page contents not supported in other languages.
विषय जोडा
Wiktionary कडून
Latest comment: १० दिवसांपूर्वी by विजयकुमार मोटे in topic आंतरजालस्पर्शी

आंतरजालस्पर्शी

[संपादन]

आज-काल बोलताना व लिहिताना मराठी भाषेमध्ये इंग्रजी शब्दांचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. विशेषतः सोशल मीडियावर.. सोशल मीडियावर 'ऑनलाईन' (Online) हा शब्द मोठ्या प्रमाणात प्रचलित आहे.

ऑनलाइन या शब्दासाठी मराठीमध्ये वापरला जाणारा योग्य शब्द कोठेही आढळून येत नाही. गुगल वर देखील आढळून येत नाही.

ऑनलाईन साठी मराठी मध्ये योग्य शब्द कोणता ? मी (विजयकुमार कुबेर मोटे) हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला. 

यामध्ये मला 'आंतरजालस्पर्शी' हा शब्द योग्य वाटला


याबाबत स्पष्टीकरण खालील प्रमाणे.


ONLINE (ऑनलाइन) या इंग्रजी शब्दाला मराठी मध्ये 'आंतरजालस्पर्शी' हा शब्द आहे..

(Internet ) इंटरनेट म्हणजे आंतरजाल..

स्पर्शी" म्हणजे स्पर्श करणारा, संपर्कात असलेला, संपर्कात येणारा , हजर असलेला....

म्हणून ऑनलाईन (Online) साठी

"इंटरनेटवरून (आंतरजालामार्फत) संपर्कात असलेला म्हणजे आंतरजालस्पर्शी ' 

अशी व्याख्या आपल्याला 'ऑनलाईन' साठी मराठीत वापरल्या जाणाऱ्या शब्दासाठी करता येईल.

यावरून

एकापेक्षा जास्त लोक ( मर्यादा असलेल्या) आंतरजालावरून संपर्कात येत असतील तर त्यावेळी 'कक्षीय आंतरजालस्पर्शी' असा शब्द वापरता येईल.


'आंतरजालस्पर्शी' या शब्दाची व्याकरण, शब्दरचना आणि अर्थ यांच्या दृष्टीने औपचारिक नोंद करता येईल.

आंतरजालस्पर्शी

शब्दप्रकार : विशेषण (आवश्यकतेनुसार नाम म्हणूनही वापरता येतो)

व्युत्पत्ती :

आंतरजाल = इंटरनेट (Inter + Net → आंतरजाल) स्पर्शी = स्पर्श करणारा, संपर्कात असलेला, संलग्न असलेला.

समास : तत्पुरुष समास (आंतरजालाशी स्पर्श/संपर्क असलेला)


उदाहरणे

आज सर्व शासकीय सेवा आंतरजालस्पर्शी पद्धतीने उपलब्ध आहेत. विद्यार्थ्यांनी अर्ज आंतरजालस्पर्शी प्रणालीद्वारे भरावेत. बँकेची आंतरजालस्पर्शी व्यवहार सेवा चोवीस तास सुरू असते. हा संगणक सध्या अनंतरजालस्पर्शी आहे. विजयकुमार मोटे (चर्चा) ०५:१३, ४ जुलै २०२६ (UTC)Reply