सदस्य:श्रीहरि~mrwiktionary
Appearance
नमस्कार ज्ञानार्त मंडळी,
माझा परिचय देण्याइतका मी विशेष नाही असे मला वाटते, ना मी अजून समाधान होईल एवढे योगदान विक्शनरीला आतापर्यंत करू शकलोय. अर्थात मी आयुष्यभर नुसते या योगदानाचे काम जरी करत राहिलो तरीही माझे समाधान होईल एवढे काम झाल्याचे काही मला वाटणार नाहीये, हे आताच प्रांजळपणाने मान्य करु द्या.परंतु ज्ञानाच्या बाबतीत अधिक हवेपणा हवाच आहे!
मी काही महिन्यांपूर्वी, साधारणपणे मार्च २००७ मध्ये, विक्शनरी प्रकल्पात सहभागाला सुरूवात केली. विक्शनरी प्रकल्पाच्या प्रत्येक सृजनशील बाबतीत शक्य होईल तेवढे माझे योगदान करत राहण्याचा मानस आहे.
सर्वांना सुमति आणि त्यांच्या सर्व सुकार्यात सुयश चिंततो.
- श्रीहरि