अंमलबजावणी
Wiktionary कडून
अनुक्रमणिका |
[संपादन] मराठी भाषा
उच्चार
|
|
[संपादन] नाम
- प्रकार : धातुसाधितनाम
[संपादन] वचन
एकवचन
- अनेकवचन : अंमलबजावण्या
[संपादन] लिंग
स्त्रीलिंगी
- पुल्लिंगी रूप : लागू होत नाही; अंमलबजावणी नेहमीच स्त्रील्लिंगी असते.
- नपुसकलिंगी रूप : लागू होत नाही; अंमलबजावणी नेहमीच स्त्रील्लिंगी असते.
[संपादन] अर्थ
आदेश अथवा नियम प्रत्यक्षात उतरवण्याची क्रिया; ठरविल्याप्रमाणे केलेली किंवा करायची कृति
[संपादन] भाषांतरे
|
|
[संपादन] भाषांतर करताना घ्यायची काळजी
[संपादन] शब्द केव्हा वापरावा
[संपादन] शब्द केव्हा वापरू नये
[संपादन] वाक्यात उपयोग
चांगल्या गोष्टींच्या अंमलबजावणीस विलंब लागू नये.
[संपादन] वाक्प्रचार
[संपादन] म्हणी
[संपादन] साहित्यातील आढळ
[संपादन] संधी व समास
[संपादन] उत्पत्ति
अंमल + बजावणी
[संपादन] अधिकची माहिती
- मुळ शब्द अंमल हा मराठी नाही.
- बजाव या धातुपासून बजावणी हा भाग तयार होतो.
- बजावमधील जा च्या उच्चारा नुसार शब्दाचा अर्थ बदलतो.बजावमधील जा चा उच्चार कठोर(आघात?) केला तर 'धाक' देणे/घालणे असा होतो.बजावमधील जाचा उच्चार मृदु केला तर वाद्यवगैरे वाजवणे असा होतो.पण जाचा उच्चार मृदु असुनही;हा शब्द प्रत्ययलागून किंवा समासात आलातर शब्द वजवण्याची क्रिया न दाखवता सक्ती सदृश्य अर्थ होतात जसे अंमलबजावणीतील जा किंवा बजावले
[संपादन] विभक्ती
| विभक्ती | एकवचन | अनेकवचन |
|---|---|---|
| प्रथमा | अंमलबजावणी | अंमलबजावण्या |
| द्वितीया | अंमलबजावणीस, अंमलबजावणीला, अंमलबजावणीते | अंमलबजावण्यांस, अंमलबजावण्यांना, अंमलबजावण्यांते |
| तृतीया | अंमलबजावणीने, अंमलबजावणीशी | अंमलबजावण्यांनी, अंमलबजावण्यांशी |
| चतुर्थी | अंमलबजावणीस, अंमलबजावणीला, अंमलबजावणीते | अंमलबजावण्यांस, अंमलबजावण्यांना, अंमलबजावण्यांते |
| पंचमी | अंमलबजावणीहून | अंमलबजावण्यांहून |
| षष्ठी | अंमलबजावणीचा, अंमलबजावणीची, अंमलबजावणीचे | अंमलबजावण्यांचा, अंमलबजावण्यांची, अंमलबजावण्यांचे |
| सप्तमी | अंमलबजावणीत | अंमलबजावण्यात |
| संबोधन | हे अंमलबजावणी, अंमलबजावणे | अंमलबजावण्यांनो |