अकरुण

Wiktionary कडून

मराठी भाषा[संपादन]

उच्चार

  • इंग्रजी (English) : akarun
  • ओरिसी : ଅକରୁଣ
  • कानडी (ಕನ್ನಡಾ) : ಅಕರುಣ
  • गुजराती (ગુજરાતી) : અકરુણ
  • तमिळ (தமிள) : அகருண
  • तेलुगू (తెలుగూ) : అకరుణ
  • पंजाबी (ਪਂਜਾਬੀ) : ਅਕਰੁਣ
  • बंगाली (বংগালী) : অকরুণ
  • मल्याळम (മല്യാളമ) : അകരുണ
  • संस्कृत (संस्कृतः) : अकरुण
  • हिन्दी (हिन्दी) : अकरुण

विशेषण[संपादन]

  • प्रकार : नामसाधित गुणवाचक विशेषण

वचन[संपादन]

एकवचन / अनेकवचन (नामाप्रमाणे)

लिंग[संपादन]

पुल्लिंगी / स्त्रीलिंगी / नपुसकलिंगी (नामाप्रमाणे)

अर्थ[संपादन]

ज्याच्या ठायी करुणा नाही असा / जिच्या ठायी करुणा नाही अशी / ज्यांच्या ठायी करुणा नाही असे; निर्दय; दयाहीन.

भाषांतरे[संपादन]

  • इंग्रजी (English) : pitiless (पिटीलेस); unkind (अनकाइंड)
  • संस्कृत (संस्कृत) : अकरुण
  • हिन्दी (हिन्दी) : अकरुण

भाषांतर करताना घ्यायची काळजी[संपादन]

शब्द केव्हा वापरावा[संपादन]

करुणेचा अभाव सौम्यपणे दाखवताना हे विशेषण वापरावे.

शब्द केव्हा वापरू नये[संपादन]

करुणेचा अभाव तीव्रतेने दाखवताना हे विशेषण वापरू नये, त्याऐवजी निर्दय वा दयाहीन ही विशेषणे वापरावीत.

वाक्यात उपयोग[संपादन]

  • एकवचनी रूपात : पर्जन्याच्या लहरीपणाने कमी पीक आल्यामुळे शेतकऱ्यांनी केलेली शेतसाऱ्यातून सूट मिळण्याची विनंती अकरुण राजाने फेटाळली.
  • अनेकवचनी रूपात : कारणकार्य व परिणाम यांच्या बाबतीत काहीच अपवाद न दाखवणारे निसर्गाचे नियम अनेकदा अकरुण भासतात.
  • पुल्लिंगी रूपात : अनियमीत पावसामुळे शेते विशेष चांगली पिकली नसल्यास शेतसाऱ्यात सवलत न देणारा अकरुण राजा शेतकऱ्यांच्या मनातून उतरतो.
  • स्त्रीलिंगी रूपात : दोन वेळच्या अन्नाची ददात असणारे भिकारी रोज पाहून पाहून नकळत एखादी व्यक्ति त्यांच्याबाबतीत अकरुण होऊन जाते.
  • नपुसकलिंगी रूपात : महासागरात टायटॅनिक जहाज बुडत असताना काही प्रवाशांना बारीक ओंडक्यांचा आसरा मिळाला खरा; परंतु अकरुण पाणी एव्हढे गार होते की, त्याच्या स्पर्शाने त्या प्रवाशांना आगीतून निघून फुफाट्यात पडल्यासारखे झाले.

वाक्प्रचार[संपादन]

म्हणी[संपादन]

साहित्यातील आढळ[संपादन]

संधी व समास[संपादन]

विग्रह : + करुण

उत्पत्ति[संपादन]

मूळ संस्कृत शब्द.

समानार्थी शब्द[संपादन]

करुणारहित, क्रूर, कठोर. [१]

अधिकची माहिती[संपादन]

तत्सम उच्चारणांचे इतर शब्द[संपादन]

  • इंग्रजी (English) :
  • संस्कृत (संस्कृत) :
  • हिन्दी (हिन्दी) :

अधिकची माहिती[संपादन]

संदर्भ[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]


संस्कृत भाषा[संपादन]


हिन्दी भाषा[संपादन]

  1. सरस्वती कोश - कोशकार कै. विद्याधर वामन भिडे