अकर्म
Appearance
मराठी भाषा
[संपादन]उच्चार
|
|
नाम
[संपादन]- प्रकार : भाववाचक / धर्मिवाचक नाम
वचन
[संपादन]एकवचन
- अनेकवचन : अकर्मे
लिंग
[संपादन]नपुसकलिंग
- पुल्लिंगी रूप : लागू होत नाही.
- स्त्रीलिंगी रूप : लागू होत नाही.
अर्थ
[संपादन]न करण्याचे काम / कर्म; वाईट काम / कर्म; दुष्कृत्य; पापकर्म; पाप; गुन्हा.
भाषांतरे
[संपादन]
|
|
भाषांतर करताना घ्यायची काळजी
[संपादन]शब्द केव्हा वापरावा
[संपादन]फारशा गंभीर नसलेल्या वाईट अनपेक्षित कामासाठी हा शब्द वापरावा.
शब्द केव्हा वापरू नये
[संपादन]गंभीर असलेल्या वाईट अनपेक्षित कामासाठी हा शब्द वापरु नये. त्याऐवजी अधिक तीव्रतादर्शक कुकर्म हा शब्द वापरावा.
वाक्यात उपयोग
[संपादन]- भारतखंडातील मध्यंतरीच्या जवळपास एक सहस्रकभर अडलेल्या विकासाचे कारण म्हणजे येथील लोकांचे आळसरूपी अकर्म होय.
- अकर्माचे फळ नेहमीच वाईट असते.
वाक्प्रचार
[संपादन]म्हणी
[संपादन]साहित्यातील आढळ
[संपादन]- तुभ्यं दक्ष कविक्रतो यानीमा देव मर्तासो अध्वरे अकर्म । तवं विश्वस्य सुरथस्य बोधि ...ऋग्वेद: सूक्तं ३.१४ - Wikisource
- किं कर्म किमकमेर्ति कवयोह्यप्यत्र मोहिता:।
तत्ते कर्म प्रवक्ष्यामि यज्ज्ञात्वा मोक्ष्यसेह्यशुभात्।। कर्मणो ह्यपि बोद्धव्यं बोद्धव्यं च विकर्मण:। अकर्मणश्च बोद्धव्यं गहना कर्मणो गति:।। गीता
- नेणती जाणते ते हि काय कर्म अकर्म हे । ... अकर्म ते हि जाणावे कर्माचे तत्त्व खोल हे ॥ १७ ॥ ...गीताई अध्याय चवथा - Wikibooks
संधी व समास
[संपादन]उत्पत्ति
[संपादन]व्युत्पत्ती
[संपादन]संस्कृत : अ अयोग्य ह्या अर्थी + कर्म
अधिकची माहिती
[संपादन]विभक्ती
[संपादन]विभक्ती | एकवचन | अनेकवचन |
---|---|---|
प्रथमा | अकर्म | अकर्म |
द्वितीया | अकर्मास, अकर्माला, अकर्माते | अकर्मांस, अकर्मांना, अकर्मांते |
तृतीया | अकर्माने, अकर्माशी | अकर्मांनी, अकर्मांशी |
चतुर्थी | अकर्मास, अकर्माला, अकर्माते | अकर्मांस, अकर्मांना, अकर्मांते |
पंचमी | अकर्माहून | अकर्मांहून |
षष्ठी | अकर्माचा, अकर्माची, अकर्माचे | अकर्मांचा, अकर्मांची, अकर्मांचे, अकर्मांच्या |
सप्तमी | अकर्मात, अकर्मी | अकर्मांत, अकर्मी |
संबोधन | अकर्मा | अकर्मांनो |
तत्सम उच्चारणांचे इतर शब्द
[संपादन]
|
|