अजहस्त्वार्थलक्षणा

Wiktionary कडून
मराठी शब्द ( हा शब्द मराठी भाषेत वापरात येतो)


• शब्दाची माहिती
  • शब्दार्थ : शब्दाच्या वाच्यार्थाहून अधिक किंवा कमी किंवा वेगळा अर्थ वाक्यात जेव्हा घ्यावा लागतो ,तेव्हा त्या शब्दावर लक्षणा केली आहे असे म्हणतात.शब्दाचा मूळ अर्थ म्हणजे वाच्यार्थ घेतलेला असून आणखी काही अधिक अर्थ घेतलेला असल्यास तेथे अजहस्त्वार्थलक्षणा होते.' कावळ्यांपासून दह्याचे रक्षण कर'ह्या ठिकाणी कावळे ह्याचा अर्थ कावळे असा घ्यायचा असून त्याचबरोबर इतरही दह्याला उपद्रव करणारे प्राणी असा अधिक अर्थ घ्यावा लागतो. ही अजहस्त्वार्थलक्षणा होय.
  • अधिक माहिती : [अ(नाही)+जहत(सोडणारा)+ स्व(आपला)+अर्थ+लक्षणा]
  • समानार्थी शब्द :

संदर्भ[संपादन]

सरस्वती शब्दकोश, कोशकार - कै.विद्याधर वामन भिडे. अजहस्त्वार्थलक्षणा on Wikipedia.Wikipedia