Jump to content

चर्चा:मुंगी

Page contents not supported in other languages.
विषय जोडा
Wiktionary कडून

वारूळ करून राहणारे छोटे कीटक ही मुंगीची व्या़ख्या अयुक्तिक आहे। वाळव्यांसारखे अगदी वेगळे कीटक वारुळात राहतात्, व सर्व मुंग्या वारुळात रहात नाहीत।प्राणिशास्त्र्यीय दृष्ट्या मुंग्या ह्या ओर्डर हायमेनोप्टेरातील फोर्मिसिडी या फेमिलीतील सुमारे १०,००० जातींचे कीटक आहेत। हे सर्वच्या सर्व समाजप्रिय आहेत, व त्यांच्यात राणी मुंगी, श्रमिक मुंग्या अशी श्रमविभागणी असते। त्यांच्या शरीररचनेत काही वैशिष्ट्ये आहेत्, उदा। लांब्, सडपातळ कंबर। बाळ सीताराम मर्ढेकरांची एक सुंदर कविता आहे। त्यातील काही पंक्ती:हा मुंग्यांचा लोंढा आला। सहस्र जमल्या लक्ष कोटिही।अब्ज अब्ज अन निखर्व मुंग्या। कुणी डोंगळे काळे काळे।कुणी तांबड्या, भुरक्या मुंग्या।कुणि पंखाच्या पावसाळि वा बेडर ग्रीषातल्या लवंग्या. कुणी बावळ्या अप्पलपोट्या मिळेल तेथे साखर चरती. कुणी पाजिती मधुरस इतरा, कुणी फळविती राणिस चतुरा. डोंगळा ही संज्ञा मोठ्या आकाराच्या मुंग्यांना वापरतात।

Start a discussion about मुंगी

Start a discussion