घिसाडी

Wiktionary कडून

नाम[संपादन]

  • प्रकार: सामान्यनाम
  • लिंग:
  • वचन: एकवचन
  • अर्थ:
  1. हिंदुंची एक जात;ह्या जातीचे लोक लोहारकी करतात.

वाक्प्रचार[संपादन]

  • घिसाडघाई करणे - कसेतरी काम करणे.

अधिक माहिती[संपादन]

महाराष्ट्रातील काही घिसाडी जमातीचे लोक सांगतात की, प्राचीन काळी हे लोक, राजपूत सैन्याच्या तलवारींना धार लावण्याचे काम करायचे आणि त्यांच्याबरोबर एका युद्धभूमीपासून दुसऱ्या युद्धभूमीकडे जायचे. यांना घिसारी (घासून धार लावणारे) म्हटले जायचे. पुढे घिसारीचे घिसाडी झाले. त्यांचे पूर्वज सैन्याला लागणाऱ्या ढाली-तलवारी तयार करणारे कारागीर आणि प्रसंगी लढणारे लढवय्ये होते आणि महाराणा प्रतापसिंहांचे आम्ही वंशज आहोत अशीही त्यांची भावना आहे.

संदर्भ[संपादन]

दै.लोकसत्ता - चतुरंग पुरवणी - सदर 'ती' मुक्त-विमुक्त - घण लोखंडावर घण आयुष्यावर - दि.०९.मे.२०१५