चर्चा:पाव

Wiktionary कडून
Jump to navigation Jump to search

खालील चर्चा मराठी विकिपीडिया वरील पाव्-क्रियापद येथून फक्त चर्चेची माहिती जतन व्हावी या दृइष्टीने जतन केली आहे।

लेख काढून टाकावा[संपादन]

’पाव’ या ’पावणे’ क्रियापदाच्या आज्ञार्थातील द्वितीयपुरुषी एकवचनी क्रियापदाकरता एक लेख लिहिण्यात काही हशील वाटत नाही. पावणे असा लेख असेल तर त्यातील एका उपविभागात ही माहिती लिहून त्याकडे पुनर्निर्देश करावा. अन्यथा हे पान काढून टाकावे.

--संकल्प द्रविड ०५:२६, २१ जानेवारी २००८ (UTC) ठीकच आहे मग टाका काढून! येचढे लिहिण्या पेक्षा स्व्तःच का नाही केले मग तसे? मी तरी आजिबात करणार नाहीये!

मी तरी आजिबात करणार नाहीये![संपादन]

ठीकच आहे मग टाका काढून! येचढे लिहिण्या पेक्षा स्व्तःच का नाही केले मग तसे? मी तरी आजिबात करणार नाहीये!


पाव[संपादन]

मूळ लेखामध्ये "(संदर्भ: मराठी व्याकरण-डॉ लीला गोविलकर)." असे होते. त्यासंबंधी:-- 'संदर्भ मराठी व्याकरण' नावाचे पुस्तक डॉ. लीला गोविलकरांनी लिहिल्याचे स्मरत नाही. 'मराठीचे व्याकरण' या नावाचे त्यांचे पुस्तक माझ्या संग्रही आहे. परंतु त्या पुस्तकात 'पाव'मधल्या 'व'चा दत्योष्ट्य उच्चार होतो असे विधान सापडले नाही. संस्कृतमध्ये उ +अ मिळून होणारा ओष्ट्य 'व'(=W) आणि 'वकारस्य दन्तौष्ठम्‌' या सूत्राने सिद्ध होणारा दंत्योष्ट्य व(=V), असे दोन व आहेत. पण 'पाव'मधील व चा उच्चार दंत्योष्ट्य करण्याचे काही संयुक्तिक कारण दिसत नाही. गोविलकरांच्या पुस्तकाचे नाव, आवृत्ती आणि पृष्ठ क्रमांक समजल्यास या गोष्टीची पडताळणी करता येईल.--J १६:१०, २५ जानेवारी २००८ (UTC)

जे, माझ स्वत:च व्यकरण ज्ञान जूजबीच आहे. खाद्यपदार्थ पाव मधील व चा उच्चार दंतोष्ठ्य असल्याचा उल्लेख मला वाटते माझाच आगाऊपणा आहे चूक लक्षात आणून दिल्या बद्दल धन्यवाद.क्रियापद पाव या शब्दात व चा उच्चार स्वतंत्र स्वरा प्रमाणे होतो असे वाचल्याचे मला चांगलेच स्मरते त्याचा आपण सुचवल्या प्रमाणे व्यवस्थित ओळ पान क्रमांका सहित संदर्भ देण्याची जबाबदारी माझी पण त्या करता मला ब‍र्‍यापैकी कालावधी लागेल.

धन्यवाद Mahitgar ०६:५१, २६ जानेवारी २००८ (UTC)

पावणे[संपादन]

पाव या खाद्यपदार्थासंबंधीच्या लेखात 'पाव' हे पावणे(=मिळणे, प्रसन्‍न होणे) या धातूचे आज्ञार्थी द्वितीय पुरुषी एकवचन (सुद्धा)आहे असा उल्लेख असायला हरकत नाही. 'पावणे' या नावाचा लेख असायचे काही कारण नाही. धातुनाम हाच मथळा असलेले लेख ज्ञानकोशात कधी असतात? त्यामुळे 'पाव - क्रियापद' हा लेख काढून टाकावा.--J १७:२८, २५ जानेवारी २००८ (UTC)