Jump to content

पुरुष

Wiktionary कडून

पुरुष ही संकल्पना क्रियापदाच्या रूपाच्या संदर्भात महत्त्वाची आहे.इंग्रजी व्याकरणातील person म्हणजे पुरुष ही संकल्पना होय. त्या क्रियेचा कर्ता कोण आहे त्यावरून त्याचा पुरुष समजतो. पुरुष तीन समजले जातात. प्रथम पुरुष म्हणजे ज्या वाक्याचा कर्ता मी किंवा आम्ही आहे. द्वितीय पुरुष म्हणजे ज्या वाक्याचा कर्ता तू किंवा तुम्ही आहे. आणि तृतीय पुरुष म्हणजे ज्या वाक्याचा कर्ता मी आणि तू सोडून उरलेला म्हणजेच इतर आहेत.

मी खातो. आम्ही खातो हे प्रथम पुरुषाचे उदाहरण आहे. तू खातेस, खातोस. तुम्ही खाता. हे द्वितिय पुरुषाचे उदाहरण आहे. तो,ती खाते, राम खातो, सीता खाते. ही तृतीय पुरुषाची उदाहरणे आहेत.