विक्शनरी:समुच्चयबोधक प्रधानसूचक उभयान्वयी अव्यय

Wiktionary कडून
Jump to navigation Jump to search

उभयान्वयी अव्यय

संयुकत वाक्यातील प्रधान वाक्ये ही प्रधानसूचक उभयान्वयी अव्ययांनी एकमेकांशी जोडलेली असतात. प्रधानसूचक उभयान्वयी अव्ययांचे चार विभाग आहेत .

• समुच्चयबोधक: आणि व आणखी ,इत्यादी • विकल्पबोधक: किंवा, अगर, अथवा इत्यादी • न्यूनत्वबोधक: पण परंतु, बाकी इत्यादी • परिणामबोधक : म्हणून , अतएव , सबब इत्यादी

माधव, गोविंदा , गोपाळ व हरी हे काल गावाला गेले व लगेच परत आले.
वारा आला आणि पाऊस गेला.

इतरेतर द्वंद्व समास: ज्या समासातील पदे आणि किंवा व या समुच्चयबोधक उभयान्वयी अव्ययाने जोडली असुन ज्या मध्ये हे अव्यय अध्याहृत असतात त्यास इतरेतर द्वंद्व समास असे म्हणतात उदा: • रामलक्षमण राम आणि लक्ष्मण • खारीकखोबरे खारीक आणि खोबरे • खानपान खान आणि पान • पानसुपारी पान आणि सुपारी