मुंगी
Appearance
मराठी
[संपादन]उच्चार/लिप्यंतर
[संपादन]
|
|
नाम
[संपादन]- प्रकार: समुदायवाचक सामान्यनाम
- लिंग: स्त्रीलिंगी (पुल्लिंगी, नपुंसकलिंगी रूप होत नाही; सर्व मुंग्यांचा उल्लेख स्त्रीलिंगी होतो.) डोंगळा हा शब्द मोठ्या आकाराच्या मुंग्यांसाठी वापरतात. तो पुल्लिंगी आहे.
- वचन: एकवचन (अनेकवचन : मुंग्या)
- अर्थ:
विभक्ती
[संपादन]विभक्ती | एकवचन | अनेकवचन |
---|---|---|
प्रथमा | मुंगी | मुंग्या |
द्वितीया | मुंगीस, मुंगीला, मुंगीते | मुंग्यांस, मुंग्यांना, मुंग्यांते |
तृतीया | मुंगीने, मुंगीशी | मुंग्यांनी, मुंग्यांशी |
चतुर्थी | मुंगीस, मुंगीला, मुंगीते | मुंग्यांस, मुंग्यांना, मुंग्यांते |
पंचमी | मुंगीहून | मुंग्यांहून |
षष्ठी | मुंगीचा, मुंगीची, मुंगीचे | मुंग्यांचा, मुंग्यांची, मुंग्यांचे |
सप्तमी | मुंगीत | मुंग्यांत |
संबोधन | मुंगे | मुंग्यांनो |
भाषांतरे
[संपादन]
वाक्यात उपयोग
[संपादन]- मुंगी सारखे कामसू व्हावे.
अधिक माहिती
[संपादन]वाक्प्रचार
[संपादन]- मुंग्या येणे - शरीराचा काही भाग बधिर होणे
- सर्वांगाला मुंग्या येणे
म्हणी
[संपादन]- मुंगी होऊन साखर खावी : छोटेपणात सुख असते.
- लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा : लहान मुलांना वा लहान माणसांना मोठ्यांपेक्षा जास्त सुख असल्याने तेच बरे.
संधी व समास
[संपादन]- मुंगीकर (एक आडनाव)
संकीर्ण माहिती
[संपादन]- मुंगळी हा समानार्थी शब्द आहे.मुंगळी पुल्लिंगीरूप मुंगळा असे होते.[१].झाडे किंवा लाकूडास खाणारी ती वाळवी.
साहित्यातील आढळ
[संपादन]- मुंगी उडाली आकाशी ही संत मुक्ताबाई यांची साहित्यकृती
- "मुंगी उडाली आकाशी । तिने गिळले सूर्यासी ॥
- थोर नवलाव झाला । वांझे पुत्र प्रसवला ॥
- विंचु पाताळासी जाए । शेष वंदी त्याचे पाय ॥
- माशी व्याली घार झाली । देखोनी मुक्ताई हसली ॥"
तत्सम उच्चारणांचे इतर शब्द
[संपादन]
|