तू
Jump to navigation
Jump to search
मराठी[संपादन]
उच्चार[संपादन]
इतर भाषात 'तू' या मराठी शब्दाचे जसेच्या तसे लेखन
|
|
सर्वनाम[संपादन]
- प्रकार:
- लिंग:
- पुल्लिंग - तू
- स्त्रिलिंग - तू
- वचन: एकवचन
- अनेकवचन : तूम्ही
- अर्थ:
- द्वितीय पुरुष, ज्याच्याशी बोलणे केले जात आहे ती व्यक्ती
विभक्ती[संपादन]
विभक्ती
|
भाषांतरे[संपादन]
Translations[संपादन]
Translation:
|
|
भाषांतर करताना घ्यायची काळजी[संपादन]
- तू करिता हिंदीतही तू हा शब्द उपयोगात असला तरी अबाल वृद्धांसहीत सर्वांना "आप" या आदरार्थी बहूवचनाने संबोधणेच सभ्यपणाचे समजले जाते
शब्द केव्हा वापरावा[संपादन]
- आपल्या पेक्षा लहान व्यक्तिंना उद्देशून बोलताना
शब्द केव्हा वापरू नये[संपादन]
- आपल्या पेक्षा वयाने /मानाने मोठ्या व्यक्तिंना उद्देशून बोलताना आपण हे आदरार्थी बहुवचन वापरले जाते. अशावेळी 'तू' चा ऊपयोग करू नये .
वाक्यात उपयोग[संपादन]
- तू कोठे जात आहेस?
- तू असशील तर आयुष्याला अर्थ आहे.तू नसशील तर आयुष्य ... तू नसशील तर आयुष्यात काय गम्य आहे? ...[१]
- प्रिया, तू गेलास त्याला किती काळ लोटला
- ... तू माझी नव्हतीस, निरोप न घेता गेलीस, ...
- तू मागे वळून पाहणार नाहीस…
- तू कधी माझी होणार नाहीस
अधिक माहिती[संपादन]
मराठीमध्ये द्वितीयपुरुषी एकवचनी संबोधनासाठी तीन प्रकारचे शब्द योजलेले आहेत. त्यातील पहिला तू हा दोन अर्थाने वापरला जातो एक तर अति-जवळच्या नात्यात अनौपचारिकपणे आणि दुसरे म्हणजे तुच्छपणे. दुसरा शब्द तुम्ही हा थोड्याशा प्रमाणात आदरार्थी आहे. तिसरा शब्द आपण हा अत्यंत आदरवाचक आहे.
उत्पत्ती[संपादन]
हा तद्भव (संस्कृतोद्भव) शब्द आहे. यातील मूळ संस्कृत शब्द त्वम्
वाक्प्रचार[संपादन]
- तू-तू मैं-मैं
म्हणी[संपादन]
संधी व समास[संपादन]
- हू-तू-तू
पदरूपे[संपादन]
संकीर्ण माहिती[संपादन]
साहित्यातील आढळ[संपादन]
- किती आवडावे मला तू... तुला मी...
- तरी का छळावे मला तू... तुला मी...
- जसा चातका आठवे पावसाळा
- तसे आठवावे मला तू... तुला मी... [२]
- लावण्य तू, सौंदर्य तू, विश्वास तू;
- आयुष्यातिल अखंडित श्वास तू.[३]
- तू अशी जवळी रहा
- त्या फुलांच्या गंधकोषी, सांग तू आहेस का ?
तत्सम उच्चारणांचे इतर शब्द[संपादन]
|
|