Jump to content

राहणे

Wiktionary कडून

मराठी

[संपादन]

शब्दवर्ग

[संपादन]

धातू

मूळ धातूरुप

[संपादन]

राह

व्याकरणिक विशेष

[संपादन]

धातुप्रकार-अकर्मक

अर्थ
[संपादन]
  1. खर्च करून, वापरून झाल्यावर काही शिल्लक राहणे.उदा,भाजी घेतल्यावर माझ्याकडे दहाच रुपये राहिले.
  2. एखाद्या विशिष्ट अवस्थेत असणे.उदा,येथे वातावरण नेहमी एकसारखेच राहते.
  3. कुणाच्या घरी जास्त काळ राहणे.उदा,दिनू महिनाभर आजीकडेच राहिला आहे.
  4. एखादी क्रिया केल्यानंतरदेखील काही मागे उरणे.उदा,चांगले घासून धुतल्यावरही हा डाग तसाच राहिला.
  5. सुरु असलेले एखादे काम काही काळ बंद होणे वा तात्पुरते बंद पडणे.उदा,वीज गेल्यामुळे काम बंद राहिले.
  6. एखादा पदार्थ खराब न होणे वा न नासणे.उदा,थंडीत पदार्थ जास्त दिवस राहतात.
  7. काही कारणामुळे एखादे कार्य होण्याचे राहणे.उदा,परीक्षेत माझे दोन प्रश्न राहिले.
  8. दुखणे नाहीसे होणे.उदा,हे औषध घेतल्याने तुझे पोटाचे दुखणे राहील.
  9. एकाच ठिकाणी अडकून राहणे.उदा,आता तुझे वडील कुठे राहिले?
  10. एखादी गोष्ट मावणे.उदा,या डब्यात पन्नास लाडू सहज राहतील.
  11. वंचित होणे.उदा,संतोषचे आपल्या वडिलांचे शेवटचे दर्शन राहून गेले.
समानार्थी शब्द
[संपादन]
  1. वस्ती करणे.
  2. उरणे.
  3. टिकणे.
  4. असणे.

हिंदी

[संपादन]

रहना(धातू)

इंग्लिश

[संपादन]

live(धातू) राहणे on Wikipedia.Wikipedia