Jump to content

वर्ग:मराठी विभक्तिप्रतिरूपक शब्दयोगी अव्यय

Wiktionary कडून

हा मराठी भाषेतील विभक्तिप्रतिरूपक शब्दयोगी अव्ययांचा वर्ग आहे.

ज्या शब्दयोगी अव्ययाचा वापर होताना मागील संबंधित शब्दाचे विभक्तिजनक सामान्यरूप होते, त्या शब्दयोगी अव्ययाला विभक्तिप्रतिरूपक शब्दयोगी अव्यय म्हणतात.

तयार होणार्‍या विभक्तीप्रमाणे (द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्ठी, सप्तमी) याचेही पोटप्रकार पाडता येतात.


विभक्तिप्रतिरूपक शब्दयोगी अव्ययांची काही उदाहरणे अशी:

विभक्ती विभक्तिप्रतिरूपक शब्दयोगी अव्यय
द्वितीया प्रत, लागी
तृतीया कडून, करवी, द्वारा, मुळे, योगे, प्रमाणे, सह, बरोबर, वतीने
चतुर्थी करिता, साठी, कडे, प्रत, प्रीत्यर्थ, बद्दल, प्रति, ऐवजी, स्तव
पंचमी पासून, पेक्षा, शिवाय, खेरीज, कडून, वाचून
षष्ठी संबंधी, विषयी
सप्तमी आत, मध्ये, खाली, ठायी, विषयी, समोर, भोवती, ऐवजी

या वर्गात सध्या कोणताही लेख वा कोणतीही माध्यमसंचिका नाही.