विक्शनरी चर्चा:आदर्श मांडणी क्रम

Page contents not supported in other languages.
Wiktionary कडून

काही टिप्पण्या[संपादन]

माझ्या टिप्पण्या ठळक केल्या आहेत.

आदर्श क्रम:

शब्द
भाषा
मूळ भाषा - मूळ कुठल्या भाषेतला शब्द आहे, त्या भाषेचे नाव
चित्र/छायाचित्र/रेखाचित्र
शब्दाचा भाषेतील उपयोगाचे संख्याशास्त्रिय परिमाणाने क्रम उपलब्ध असल्यास
शब्दाचे क्लिष्टता मापन ऊपलब्ध असल्य़ास
शब्दाचे आय पि ए उच्चारण,मेडीया फाईल/ऱ्हस्व उच्चारण/दीर्घ उच्चारण/उच्चारणातील आघात
मुळ शब्द
शब्दाचे विविध अर्थ
पारिभाषिक संज्ञा असल्यास व्याख्या
शब्दाचे वाक्यपयोग,
साहित्यातील वृत्त/अलंकार/साहित्यिक प्रतिमा उपयोग
शब्द विग्रह
शब्दातील प्रत्यय - "या शब्दापासून बनलेले इतर शब्द" (किंवा अजून एखाद्या चाअंगल्या शीर्षकाच्या) मथळ्याखाली पोटमथळा म्हणून लिहावा.
शब्दातील उपसर्ग - "या शब्दापासून बनलेले इतर शब्द" (किंवा अजून एखाद्या चाअंगल्या शीर्षकाच्या) मथळ्याखाली पोटमथळा म्हणून लिहावा.
शब्दातील संधी आणि समास - "या शब्दापासून बनलेले इतर शब्द" (किंवा अजून एखाद्या चाअंगल्या शीर्षकाच्या) मथळ्याखाली पोटमथळा म्हणून लिहावा.
शब्दाची शक्य अस्लेली सर्व सामान्यरूपे - विभक्तिप्रत्यय का इतर काही रूपे? (मुद्दा कळला नाही.)
शब्दाची पदरूपे - विभक्तिप्रत्यय का इतर काही रूपे? (मुद्दा कळला नाही.)
शब्दाचा प्रकार - हे सर्वात वरच्या क्रमावर हवे. 'बेसिक' माहिती असल्याकारणामुळे याचे महत्त्व जास्त आहे.
शब्दाचे उपप्रकार - हे सर्वात वरच्या क्रमावर हवे. 'बेसिक' माहिती असल्याकारणामुळे याचे महत्त्व जास्त आहे.
शब्दाचे प्रकारानुसार बदलणारे अर्थ
शब्दाचे/पदाचे वाक्यातील स्थाना नुसार बदलणारे अर्थ
शब्दाचे वचन - हे सर्वात वरच्या क्रमावर हवे. 'बेसिक' माहिती असल्याकारणामुळे याचे महत्त्व जास्त आहे.
शब्दाचे लिंग - हे सर्वात वरच्या क्रमावर हवे. 'बेसिक' माहिती असल्याकारणामुळे याचे महत्त्व जास्त आहे.
शब्द केव्हा वापरावा
शब्द केव्हा वापरू नये
शब्दाची व्युत्पत्ती
उदभव:देशिय/तत्सम/तद्भव/तामील/म्ल्ल्यालम/कन्नड/तेलगु/गुजराथी/हिंदी/फार्सी/उर्दू/आरेबिक/पोर्तुगिज/इंग्रजी/प्फ़्रेंच/जर्मन/इतर भाषा
शब्दाचा इतिहास आणि (प्रोटो इंडो-इराणी अथवा प्रोटो-इंडो-आर्यन शब्द ऊपलब्ध अस्ल्यास)
शब्द मोडीत कसा लिहीला असेल
शब्द रोमन आणि इतर लिपीत कसा लिहावा
समान अर्थी मराठी शब्द
समानार्थी बोली शब्द
शब्दा वापरलेले वाक्प्रचार/म्हणी
विरुद्धार्थी मराठी शब्द
समान उचारणांचे इतर मराठी शब्द
इतर भाषातील समानार्थी शब्द
भाषांतर करताना घ्यावयाची काळजी
he suddha paha
saMdarbha
baahya duve


वर्गीकरणे

शब्दाच्या प्रकार/उपप्रकारानुसार/पद/लिंगविचार/वचनविचार/विभक्ती विचार/वाक्प्रचार/म्हणी/अल्पाक्षरी/संधी/समास/पद/वाक्यातील कार्य/काळ
शिष्ट/अशीष्ट/सभ्य/असभ्य/प्रमाण/बोली/ऐतिहासिक/फक्त लिखीत/शब्द रस शक्ति/ शब्दाचा मराठी भाषेतील वापर/शृंगारीक अर्थाचे/विषयवार पारिभाषिक संज्ञा/शालेय/अशालेय/चुकीचे लेखन दाखवलेले (असे लिहू नका);वर्णमाला,चिन्हे ,विरामचिन्हे,जोडाक्षरे
वर्णानुक्रम/अंत्यस्वर/उपांत्यस्वर/अंत्यव्यंजन/ऱ्हस्व-दीर्घ,इकार-उकार/शब्दकोड्यातील रकान्यानुसार अक्षरसंख्या
शब्दाचे भाषेतील वापराचे प्रमाणानुसार अनुक्रम/ भाषा उद्भव
प्रबंधकीय श्रेणी: अपूर्ण/विवाद्य/अनिश्चित/विकिकरण/शुद्धलेखन सुधारणा/विशेष/चित्रे हवे/ मेडीया हवे/विशीष्ट संदर्भ असलेले-संदर्भ हवे असलेले.
aaMtarawiki duve

--संकल्प द्रविड ०७:०४, २१ मार्च २००७ (UTC)Reply[reply]

आदर्श मांडणीक्रमात फेरबदलाबद्दल काही सूचना[संपादन]

माहितगार व सर्व विक्शनरीकरांनो,

आदर्श मांडणीक्रमात सुटसुटीतपणा येण्याकरिता मी काही बदल सुचवीत आहे. मुंगी या लेखात वापरल्याप्रमाणे हा क्रम पुढीलप्रमाणे सांगतो:

 • भाषेचे नाव : कुठल्या भाषेतील शब्दाबद्दल ही माहिती लिहिली आहे ते नाव. एकाच लिखाणाचे शब्द दोन भाषांत असू शकतात. त्यावेळेला या मुद्द्या-उपमुद्द्यांचा गट एकापेक्षा अधिक वेळा येऊ शकेल.)
  • व्याकरणदृष्ट्या प्रकार - नाम/क्रियापद/विशेषण/अव्यय. यात पुढील माहिती असावी:
   1. व्याकरणप्रकारातील उपप्रकार - नाम असेल तर विशेषनाम, सर्वनाम, सामान्यनाम; अव्यय असेल तर अव्ययाचा प्रकार इत्यादी
   2. लिंग - व्याकरणदृष्ट्या प्रकार नाम असल्यास नामाचे लिंग. अन्य लिंगांतील रूपे उपलब्ध असल्यास तीही लिहावीत.
   3. वचन - नाम असल्यास नामाचे वचन. एकवचन, अनेकवचन अशा दोन्ही वचनांची रूपे उपलब्ध असल्यास दोन्ही लिहावीत.
   4. अर्थ - अर्थ. विविध अर्थ असतील तर एकाखाली एक आकडे टाकून अर्थ लिहावेत.
   • विभक्ती - नाम प्रकारातील शब्द असल्यास विभक्तीरूपे. एकापेक्षा अधिक अर्थाने वापरल्या जाणार्‍या शब्दाची अर्थानुसार वेगवेगळी रूपे होत असतील तर ती 'अर्थ' या उपमुद्द्यात लिहिल्याप्रमाणे एकाखाली एक अशा टेबलांत लिहावीत.
   • क्रियापदरूपे - क्रियापद असल्यास तिन्ही पुरुषांतील दोन्ही वचनांतील रूपे लिहावीत.
   • भाषांतरे - अन्य भाषांतील समानार्थी शब्द (भाषांतर) या विभागात लिहावेत. एकाच शब्दाच्या एकाहून अधिक अर्थांची भाषांतरे उपलब्ध असतील तर ती 'अर्थ' या उपविभागाप्रमाणे एकाखाली एक अशा टेबलांमध्ये लिहावीत.
   • वाक्यात उपयोग - शब्दाचा वाक्यातील उपयोग सांगणारे एखादे उदाहरण. एकाच शब्दाच्या एकाहून अधिक अर्थांचे वाक्यातील उपयोग लिहायचे असतील तर ते 'अर्थ' या उपविभागाप्रमाणे एकाखाली एक असे आकडे टाकून लिहावेत.
  • अधिक माहिती - या विभागात शब्दाबद्दल उपलब्ध असलेली भाषाशास्त्रदृष्ट्या अधिक माहिती लिहावी. उदा.: उत्पत्ती, वाक्प्रचार, म्हणी, संधी व समास.
   • उत्पत्ती - हा शब्द मूळ कुठल्या भाषेतील कुठल्या शब्दावरून आला आहेर त्याची माहिती.
   • वाक्प्रचार - या शब्दाचा समावेश असलेले वाक्प्रचार व त्यांचे अर्थ.
   • म्हणी - हा शब्द असलेल्या म्हणी व त्यांचे अर्थ.
   • संधी व समास - हा शब्द वापरून बनवेलेले संधियुक्त व सामासिक शब्द व त्यांचे अर्थ.
  • संकीर्ण माहिती - या विभागात trivia स्वरूपाची माहिती लिहावी. उदा.: साहित्यातील आढळ, तत्सम उच्चाराचे इतर शब्द
   • साहित्यातील आढळ - हा शब्द एखाद्या पुस्तकातील वाक्यात/ कवितेत वापरला गेला असल्यास पुस्तकाचा, लेखकाचा संदर्भ देऊन लिहिलेले त्याचे 'अवतरण'.
   • तत्सम उच्चाराचे इतर शब्द - या शब्दाच्या उच्चारासारखे इतर शब्द. प्राधान्याने मराठी भाषेतील, व उपलब्ध असल्यास अन्य भाषांतील.
  • संदर्भ - पुस्तकी संदर्भांची यादी
  • बाह्यदुवे - आंतरजालीय माहितीपर दुव्यांची यादी.
  • वर्गीकरण

हा क्रम शब्दाबद्दल लागणार्‍या माहितीविशेषांच्या प्राधान्याने मांडायचा प्रयत्न केला आहे. एखाद्या शब्दाचे 'व्याकरणदृष्ट्या वर्गीकरण', 'अर्थ', व्याकरणाची प्रमुख माहिती, 'परकीय भाषांतील प्रतिशब्द (भाषांतर)', 'वाक्यात उपयोग' ही माहिती मुख्य प्राधान्याची वाटते. त्यामुळे ती मांडणीत वर ठेवण्याचा प्रयत्न आहे. 'शब्दाची उत्पत्ती', भाषेतील त्याचा वपर दर्शविणारे वाक्प्रचार, म्हणी, संधी/समासयुक्त शब्द ही भाषाशास्त्रीय दृष्टिकोनातून मांडलेली माहिती त्याखालोखाल असावी. आणि 'साहित्यातील आढळ', 'समान उच्चाराचे शब्द' वगैरे trivia स्वरूपाची माहिती सर्वात शेवटी लिहावी.

या क्रमाबद्दल सूचना, आक्षेप, टीका, टिप्पण्या स्वागतार्ह आहेत.

--संकल्प द्रविड ०४:४२, ४ एप्रिल २००७ (UTC)Reply[reply]

साहित्यातील आढळ[संपादन]

यातील 'साहित्यिक प्रतिमा उपयोग' म्हणजे काय? तसे मेडिया फाईल? की मीडिया?--J--J १७:२४, ६ ऑगस्ट २००७ (UTC)Reply[reply]

J,
आपल्या विक्शन‍रीवरील योगदाना बद्दल धन्यवाद।
'साहित्यिक प्रतिमा उपयोग' म्हणताना एखादा शब्द कवितेत किंवा साहित्यात ऊपमा किंवा तशाच इतर अलंकारात वापरला जात असेल तर त्याबद्दल माहिती देता यावी असे मला अभिप्रेत आहे। आपली याबद्दल काही सूचना असेल तर अवश्य बदल करावेत किंवा तसे कळवणे।
मेडिया फाईल? की मीडिया आपण सांगितलेला बदल करत आहे
Mahitgar १६:५९, ८ ऑगस्ट २००७ (UTC)Reply[reply]