Jump to content

सदस्य चर्चा:Akshay Deokar

Page contents not supported in other languages.
विषय जोडा
Wiktionary कडून


मराठी मिंत्रांनो मराठीत संवाद साधा

[संपादन]

अभ्यस्त होण्यासाठी स्वत:स वेळ द्या

[संपादन]

नमस्कार,

प्रथमत: मराठी विक्शनरीवरील आपल्या अलिकडील योगदानासाठी धन्यवाद. आपणास सुगमपणे मराठीतून संवाद साधण्यास अडचण असल्यास आपल्या अडचणींचे स्वरूप सांगावे जेणे करून मराठीतून संवाद कौशल्य शिकु इछिणाऱ्यांसाठी असलेले Learning Marathi पुस्तक अद्ययावत करताना सुयोग्य मार्गदर्शनाचा आंतर्भाव करता येईल.


मराठी विक्शनरी हा प्रकल्प मराठी भाषकांसाठी असल्यामुळे दोन मराठी भाषकांनी आपापसातील संवाद सहसा मराठीतून साधणे अभिप्रेत आहे हे लक्षात घ्यावे. आपापसातील संवादात अनावश्यक परकीय भाषांचा वापर परकीय भाषा वापरणाऱ्यांचा अंहकार अथवा न्यूनगंड सूचीत करतो; मुख्य म्हणजे आपण ज्यांच्याशी संवाद साधू इच्छिता त्यांना परकीय भाषेतून साधला गेलेला संवाद अपमानास्पदही वाटू शकतो हे आपण कदाचीत लक्षात घेतले नसावे. त्याही पेक्षा महत्वाचे ज्ञान विषयक सर्व सुविधा मराठी भाषेतून उपलब्ध करण्यासाठी रात्रंदिवस आटापिटा करणाऱ्यांच्या मेहनतीचा न कळत अवमान होतो; हे वेगळे सांगावे लागणे आपल्या मातृभाषेसाठी मेहनत करणाऱ्यांचे अंत:करण पिळवटणारे असू शकते हा मुद्दा लक्षात घेऊन या पुढील संवाद मराठीतून साधले जावेत अशी विनंती करतो आणि आपल्या सहकार्याची अपेक्षा बाळगतो.


जेथ पर्यंत विक्शनरी प्रकल्पांच्या भाषावार रचनेचा संबंध आहे. जिथ पर्यंत विकिप्रकल्पांचा संबंध आहे प्रत्येक विकिप्रकल्प भाषावार स्वतंत्र (ॲटॉनॉमस) आहे. प्रत्येक भाषी विक्शनरी मध्ये सर्वभाषातील शब्दांचा आंतर्भाव केला जात असला तरीही प्रत्येक भाषी विक्शनरीत व्याकरण विषयक संबंधीत माहिती आपापल्या भाषेतून सादर केली जाते. प्रत्येक भाषेच्या/भाषिकांच्या भाषिक स्वरूप आणि स्थानिक गरजा वेग-वेगळ्या असतात. तशा त्या मराठी भाषेसही वेगळ्या स्थानिक गरजा आहेत ज्यांच्या बद्दल मराठी विक्शनरी प्रकल्पाने विशेषत्वाने काळजी घेणे जरूरी आहे; ज्या बद्दल मी येत्या काळात सविस्तर आपणास लिहिनच.

आपल्या सवडी नुसार मराठी विक्शनरीच्या रचनेच्या आणि मराठी व्याकरणाच्या अभ्यासा साठी सवडी नुसार येथील साहाय्य पानातून माहिती घ्यावी अशी विनंती आहे. आपल्या सवडीनुसार मराठी विक्शनरी चे वाचन आणि लेखन आपल्याकडून घडत राहो ही शुभेच्छा.

Mahitgar (चर्चा) १७:४४, १३ सप्टेंबर २०१४ (UTC)Reply