सूची:चंदगडी बोलीभाषा
हे सुद्धा पहा: s:चंदगडी बोली लोकगीते; s:चंदगडी बोली लोककथा
निवडक शब्दसंग्रह (पूर्व विभाग)
[संपादन]चंदगडी - मराठी आळकी - अन्याय आचुती - विनासायास अजमास - अंदाज आडगारी - मध्यम वयीन आळ - मजुरी आळती - माप इदगार - समोर इस्टन - मालमत्ता इळगी - विळती उदार - अंगण उल्लस्क - थोडं कण्ण - केव्हा कास - कशाला करबेव - कडीपत्ता कामाटे - टोमॅटेा खट्टे - कोठे कवाट - आंडे कसारकी - कनकन खेटोन - चिकटून गवर - शेणखत गोरं - जनावरे चकोट - चांगले चंदी/वळचन - बोळ ढगाटा - शेकोटी तगाड - पत्रा तंड - चिरा निसण - शिडी बळ्यान - खोटं बदीक - शेजारी बळगार - कासार बडगी - सुतार भवणे - फिरणे म्हणी - पाट मोसबा - नखरा वांगड - भाजी व्हगं - आडाणी व्हलस - घाण व्हादडण े - मारणे सूडगाड - स्मशान रग्गड - पुष्कळ रंगवाचक शब्द चंदगडी - मराठी काळाबेरा/काळशेला/काळवांडलेला - काळा तांबडा/लालबूंद - लाल नारंगी - नारंगी मातकट/मातेरी - चॉकलेटी मोसंबी/हाळदुळा/पिवळाधम्मक - पिवळा गोरटेला/उजळ - पांढरा घारटेला - घारा जांभळा - जांभळा निळा - निळा गुलाबी - गुलाबी हिरवट/हिरवा - हिरवा चाकलेटी - चॉकलेटी तपकीरी - तपकीरी आकाशी - आकाशी किरबीरा - काळा-पांढरा काळ-वेळ वाचक शब्द चंदगडी - मराठी धुंदरूक - पहाटेचा अंधार मळभ - पावसाची चाहुल धुगटीत - धुके/धुक्याची वेळ दवारात - दवात सकाळी कातया - कार्तिक महिन्यातील काही दिवस वातीत - दसर्यातील काही दिवस इजा - वजिा मगणं - नंतर दिसभर - दिवसभर ऊरीस - वर्ष पुनवा - पोर्णिमा आमोशा/ऐासेत - आमवशा यदव - आत्ता माणं - नंतर मागेंदी - मागील वर्षी औंदू - यावर्षी लाणीत - पावसाळयात मिरगात - पावसाच्या प्रारंभी वातीत - दसर्यातील काही दिवस वकोत - वेळ निंबार - दुपारचे ऊन सांचं - संध्याकाळ यरवाळी - सकाळी लवकर मद्यानराती - मध्य रात्री रांडपुणव - चुडीपुणव - पंदरादी - पंधरा दिवसानी आज आठ दिवस - आठवड्याने ध्याडबर - बराच वेळ आगोप - लवकर गापक्यान - पटकन मापेवाचक शब्द चंदगडी - मराठी आरदा - अर्धे आरगाडा - मोठा थोरला - मोठा ॠव्वा - सव्वा दिड - दिड कंबरबर - कंबरेयेवडा खोल कासराबर - एक दोर लांब (दहा मिटर) वावबर - दोन्ही हातायेवढा लांब यांगबर - मिठ्ठी येवढा कनबर - खूप कमी मन - एक मण फरलांगबर - जवळपास अर्धा कि. मी. खंडीबर - बारा पोती पायली - चार शेर शेर - शेर (जवळपास एक लिटर) गिरपाव - पाव लिटर पाव - पाव मापटं - अर्धा शेर आरगीडी - माठी गटलबर - अर्धे पोते चिलबर - एक पोते नक्काडी - थोडी हुचीतेवडी - बरीच बीरीबर - बैलगाडीच्या बिरीपर्यंत भरुन
अंकवाचक शब्द
[संपादन]चंदगडी - मराठी योक/यकुच - एक दोन - दोन तीन - तीन चार - चार पाच - पाच सहा - सा सात - सात आठ - आठ नऊ - नव दहा - धा इस - वीस पनास - पन्नास साट - साठ
नातेवाचक शब्द
[संपादन]चंदगडी - मराठी
आयी - आई बाबा - वडील आप्पा - मोठा भाऊ आऊ - मोठी बहिण काकू - काकी तात्या - काका मावसा/मावशाप्पा - मावशीचा नवरा मावसी - मावशी इन - मुलग्याची किंवा मुलगीची सासू इवाय - मुलग्याची किंवा मुलगीची सासरा आत्ती - आत्या मामा - मामा/सासरा मामी - मामीस=/सासू मामाची आई - आजी मामाचा बाबा - आजोबा म्हातार बा - आजोबा म्हातारआई - आजी आक्का - बहिण आण्णा - भाऊ घो - नवरा बायको - बायको पॉर - मुलगा पोर - मुलगी सवतीरभाव - सावत्र भाऊ
वार
[संपादन]चंदगडी - मराठी सोमार - सोमवार मंगळवार - मंगळवार बुधवार - बुधवार बेस्तरवार - गुरुवार सुक्रवार - शुक्रवार शनवार - शनिवार आयीतवार - रविवार
शरीराचे अवयव
[संपादन]चंदगडी - मराठी क्यास - केस डोचकं - डोकं मानगुटी - मान गालफाड - गाल कानसुल - कान नाकपुड्या - नाक डोळे - डोळे जबडा - तोंड टाळू - टाळू हनवटी - हनुवटी बगल - बगल काख - बगल दंड - दंड मनगाट - मनगट तळवा - तळवा बॉट - बोट खुबा - कंबर ढोपार - ढोपर ढुंगान - ढुंगन कुल्ला - ढुंगन बावटा/बावळा - खांदा पाट/ पॉट - पोट ढँग - दोन पायातील जागा खोपर - खोपर कंबार - कंबर रट्टा - हात बॉट - बोट
ऋतू/दिनचर्या
[संपादन]चंदगडी - मराठी सक्कळी - सकाळी धुंदरुकी - सकाळच्या आंधारात दुपारान - दुपारी निंबराच ं - दुपारच्या उन्हात सांचं/सांज - संध्याकाळी रात - रात्र च्यान्यात - चांदण्यात यरवाळी - सकाळी लवकर भिगीणं - लवकर मिरगात - मृग नक्षत्रामध्ये लानीत - शेतीचा एक सिजन रोपेत - रोप लावणीचा काळ शिगम्यात - शिमगा या सणावेळी (उन्हाळ्यात) म्हाईडे - यात्रेच्यावेळी पावसात - पावसाळ्यात थंडीत - हिवाळ्यात उन्हाळ्यात - उन्हाळ्यात