अंकलिपी

Wiktionary कडून
मराठी शब्द ( हा शब्द मराठी भाषेत वापरात येतो)


• शब्दाची माहिती
  • शब्दार्थ :मराठी भाषेच्या लिपीतील मुळाक्षरे आणि अंक यांची, विशेषत: लहान मुलांना ओळख करून देणारे छोटे पुस्तक.
  • अधिक माहिती :या पुस्तकात अक्षरओळख नीट व्हावी म्हणू्न मुळाक्षरे असलेले शब्द त्यासंबंधी चित्रे काढून छापलेले असतात. मराठीतील सोपी वाक्ये, १ ते शंभर अंक, पाढे वगैरे माहिती असल्याने लहान मूल लिपी लिहायला आणि वाचायला शिकते.
  • समानार्थी शब्द :अक्षरओळख करून देणारे पहिले पुस्तक.
  • इतर भाषेत उच्चार :
• इतर भाषेतील समानार्थी शब्द
शब्दाचे व्याकरण

: अंक+लिपी=अंकलिपी. दोन नामांचा झालेला द्वंद्व समास.