अकर्तृक
Appearance
मराठी शब्द ( हा शब्द मराठी भाषेत वापरात येतो)
• शब्दाची माहिती
- शब्दार्थ : ज्याला कर्ता नाही ते, स्वयंसिद्ध.
- अधिक माहिती : (व्याकरण)
- ज्या क्रियापदाचा कर्ता निराळा असून क्रियापदातच निगूढ रूपाने असतो ते (क्रियापद) क्रियापदाचा कर्ता वाक्यात योजिलेला नसून तो कोण आहे, म्हणजे कर्त्याच्या जागी कोणता शब्द योजितां येईल, हेहीं समजत नाही असे क्रियापद.
- अशा क्रियापदांना भावकर्तृक, अज्ञातकर्तृक, अशीही नावे देण्यात येतात. अशा क्रियापदांचा जो भाव तोच क्रियापदांचा कर्ता असतो. आणि त्याला स्वतंत्र अवस्थिती वाक्यात नसते. उदाहरणार्थ, सांजावणे, फावणें, कळमळणे, उजाडणें इ.
- समानार्थी शब्द :
- इतर भाषेत उच्चार :
- व्युत्पत्ती : संस्कृत : अ नकारार्थक + कर्तृ = करणारा + क
- प्रकार : विशेषण
[१] अकर्तृक on Wikipedia.Wikipedia
- ↑ सरस्वती कोश - कोशकार कै. विद्याधर वामन भिडे