अकल्पनीय
Appearance
भाषा = मराठी
[संपादन]व्याकरण
[संपादन]- शब्दाचा प्रकार : विशेषण
वचन
[संपादन]एकवचन / अनेकवचन (नामाप्रमाणे)
लिंग
[संपादन]पुल्लिंग / स्त्रीलिंग / अलिंग (नामाप्रमाणे)
अर्थ
[संपादन]- कल्पना न करता येण्यासारखा / येण्यासारखी / येण्यासारखे / येण्यासारख्या (सकारात्मक व नकारात्मक अशा दोन्ही प्रकारे)
- आश्चर्यजनक; विस्मयकारक (सकारात्मक)
भाषांतर
[संपादन]- इंग्रजी (English) :
- unimaginable (अनइमॅजिनेबल)
- surprising (सरप्राईजिंग)
- संस्कृत (संस्कृत):
- हिंदी (हिंदी):
- कल्पना से परे
- आश्चर्यजनक
उपयोग
[संपादन]- देवराज इंद्राचा असुरांच्या हाती झालेला पराभव अकल्पनीय होता, पण तो याचेही प्रत्यक्ष प्रमाण होता की, कर्मफळाचे बंधन देवांनाही चुकलेले नाही.
- ज्ञानदेवांनी केवळ सोळाव्या वर्षी श्रीमद्भगवद्गीतेवर केलेले इतके सुंदर तात्त्विक व सखोल विवेचन अकल्पनीय आहे.
उत्पत्ती
[संपादन]अधिकची माहिती
[संपादन]- विरुद्धार्थी शब्द : कल्पनीय
- ↑ सरस्वती कोश - कोशकार कै. विद्याधर वामन भिडे