अडचण

Wiktionary कडून
मराठी शब्द ( हा शब्द मराठी भाषेत वापरात येतो)


• शब्दाची माहिती
  • शब्दार्थ :
  1. जागेचा संकुचितपणा.
  2. दाटी किंवा गर्दी यामुळे होणारा त्रास किंवा उपद्रव.
  3. संकट.
  4. अडगळ.
  5. टंचाई,जरूर अशा वस्तूंचा अभाव किंवा कमीपणा.
  6. बायकांना विटाळामुळे वगैरे प्राप्त होणारी गैरसोयीची स्थिती.
  • अधिक माहिती :
  1. अडचणीचे दुःख - शरीराच्या गुह्य स्थानी झालेला रोग ,आजार.
  2. अडचणी सांगणे - काम चुकविण्यासाठी किंवा टाळण्यासाठी काहीतरी सबबी सांगणे.
  3. अडचणीचे दुःख आणि जावई वैद्य - खात्रीने संकटाचे निवारण करू शकेल असा मनुष्य जवळ असता त्याची मदत घ्यावयाला भीति,लाज,संकोच वगैरे वाटते अशी स्थिती.
  • समानार्थी शब्द :

संदर्भ[संपादन]

सरस्वती शब्दकोश, कोशकार - कै.विद्याधर वामन भिडे. अडचण on Wikipedia.Wikipedia