देवनागरी

Wiktionary कडून
 • या लेखाचे देवनागरी लिपी या लेखात विलीनीकरण करावे असे सुचवले गेले आहे. चर्चा पानावर अधिक चर्चा करा.


लिप् - लिंपणे =लिपी -लिपिक लिख्- कोरणे = लेखन

देवनागरी ओळख[संपादन]

देवनागरी लिपी बऱ्याच भारतीय भाषांची प्रमुख लेखन पद्धती म्हणुन वापरली जाते आहे. जसे की संस्कृत, पाली, हिन्दी, मराठी, कोकणी, सिन्धी, काश्मीरी, नेपाळी, बोडो, अंगिका, भोजपुरी, मैथिली, रोमा इत्यादी लिहिल्या जातात. देवनागरी बऱ्याच इतर भाषांप्रमाणे डावीकडून उजवीकडे लिहिली जाते. प्रत्येक शब्दाच्या वर एक रेषा ओढली जाते. हिचा विकास ब्राम्ही लिपीपासून झाला. ही एक ध्वन्यात्मक लिपी आहे जी इतर लिप्यांपेक्षा (रोमन, अरबी, चीनी इत्यादी) अधिक वैज्ञानिक आहे.


जगातील कोणत्याही भाषेतील कोणताही शब्द किंवा ध्वनी देवनागरी लिपीमध्ये जसाच्या तसा लिहिता येतो आणि लिहिलेल्या शब्दाचे हुबेहुब उच्चारण करता येऊ शकते, जे इंग्रजी किंवा इतर लिप्यांमध्ये शक्य नाही.

यात एकुण ५२ अक्षरे आहेत, ज्यात १४ स्वर आणि ३८ व्यंजने आहेत. अक्षरांचा क्रमसुद्धा वैज्ञानिक आहे. स्वर-व्यंजन, कोमल-कठोर, अल्पप्राण-महाप्राण, अनुनासिक-अन्तस्थ-उष्म इत्यादी वर्गीकरणही वैज्ञानिक आहे.

भारत तसेच अशिया मधील अनेक लिप्यांचे संकेत देवनागरीपेक्षा वेगळे आहेत. ( उर्दू सोडून) पण उच्चारण व वर्ण-क्रम इत्यादि देवनागरीसारखेच आहेत. त्यामुळे लिप्यंतरण करणे सोपे जाते. देवनागरी लेखनाच्या दृष्टीने सरळ, सुंदर आणि वाचनाच्या दृष्टीने सुपाठ्य आहे.

देवनागरी लिपी वैशिष्ट्ये[संपादन]

 • डावी कडून उजवी कडे
 • बहुतेक ध्वनी करिता एक स्वतंत्र वर्ण/ अक्षर चिन्हे /जोडाक्षरे
 • ध्वनी

संगणक आणि देवनागरी[संपादन]

मराठी, हिंदी तसेच संस्कृत आणि इतर काही भाषांनी देवनागरी लिपी ही मुख्य लिपी म्हणून स्वीकारली आहे. येथे हे समजणे गरजेचे आहे की भाषा आणि लिपी या दोन पूर्णपणे वेगळ्या बाबी आहेत उदाहरणार्थ -

मराठीमध्ये वापरला जाणारा संगणक हा शब्द संस्कृत भाषेतून उगम झालेला आहे. तो देवनागरी लिपीतून `संगणक' असा तर इंग्रजी लिपीतून 'sanganaka' असा लिहितात. तसेच त्याला इंग्रजी भाषेतला समानार्थी शब्द computer हा देवनागरीतून कॉम्प्यूटर असा लिहिला आणि यशस्वीरित्या वाचलाही जाऊ शकतो.

संगणक-मराठी संबंधाविषयी[संपादन]

 • संगणकाचा वापर इंग्रजी भाषेतून किंवा अधिक अचूक सांगावयाचे झाल्यास इंग्रजी(रोमन) लिपीतून सुरू झाला आणि नंतर जगभर पसरला. आजमितीला तरी जगाची ज्ञानभाषा आणि संपर्कभाषा म्हणून इंग्रजी भाषेला महत्त्वाचे स्थान आहे. त्यामुळे अनेक महत्त्वाच्या तंत्रज्ञानांचा शोध आणि प्रगती इंग्रजी भाषेतून झाली. यात संगणकाचा देखील समावेश होतो. संगणकाशी निगडित प्रगती झपाट्याने होण्यामागचे एक महत्त्वाचे पण अप्रत्यक्ष कारण रोमन लिपी हे देखील आहे. ही बाब संगणकअभियंत्याना सहज समजेल. यासंबधीची अधिक माहिती संगणक टंक हा लेख देईल. या बाबीचा अप्रत्यक्ष फायदा जर्मनी, स्पेन, रशिया वगैरे देशांना (किंवा त्यांच्या भाषांना वा लिप्यांना झाला).


तिरप्या मुद्राक्षरातील मजकूर==देवनागरी सॉफ्टवेअर==

 • 'थंडरबर्ड' हे ईमेल सॉफ्टवेअर मराठीतून ईमेल पाठवण्यासाठी तसेच आलेले मराठी ईमेल वाचण्यासाठी उपयुक्त आहे. हे सॉफ्टवेअर मोझीला.ऑर्ग ह्या संकेतस्थळावरून डाऊनलोड करता येईल.
 • वॉशिंग्टन विद्यापीठकडून देवनागरीसाठी कळपाटाच्या (कीबोर्ड) जुळणीचे (मॅपींग) सॉफ्टवेअर उपलब्ध आहे. ह्या जुळणीचा उपयोग करून वर्डपॅड किंवा तत्सम युनिकोडमध्ये शब्दरचना करू शकणार्‍या सॉफ्टवेअरमध्ये रचलेला मजकूर आपण विकिपीडियामध्ये कॉपी - पेस्ट करु शकता.
 • आपल्याकडे अक्षरमाला सॉफ्टवेअर अक्षरमाला उपलब्ध असेल तर आपण त्यातच विकिपीडिआची पाने बदलू शकता, नाहीतर आय् ट्रान्स् ह्या सॉफ्टवेअरचाही उपयोग करता येऊ शकतो.
 • याशिवाय युडिट एडिटरही वापरता येऊ शकतो.
 • अन्यथा आपण बरहा येथे उपलब्ध असलेल्या देवनागरी सॉफ्टवेअरचाही वापर करू शकता.
 • देवनागरी लिपीत लिहिण्यासाठी तख़्ती या सॉफ्टवेअरचाही उपयोग करता येतो.
 • याशिवाय गुगल इनपुट टूल याचा सुद्धा वापर करू शकता.

हे सुद्धा पहा[संपादन]


बाह्य दुवे[संपादन]


हे सुद्धा पहा[संपादन]