Jump to content

सहाय्य:नवीन लेख कसा लिहावा

Wiktionary कडून

मराठी विकिवर सुरू करण्याच्या २ पद्धती आहेत.

१. संदर्भित पानावरून दुवा तयार करून. एखाद्या पानावरील एखाद्या शब्दाबद्दल लेख लिहायचा असल्यास --

जर संदर्भित पानावर तो शब्द लाल रंगात व अधोरेखित (underlined) असेल, तर त्या शब्दावर टिचकी देताच लेख संपादित करावयाचे पान येईल. येथे लेख लिहून झाल्यावर save करावा. जर लाल रंगात नसेल, तर संदर्भित लेख संपादन करून त्या पानावरील ईच्छित शब्द दुहेरी चौकटी कंसात ([[]]) लिहील्यास असा दुवा तयार होईल. त्यावर टिचकी देता 'असा' हा लेख संपादित करायचे पान येईल. येथे लेख लिहून झाल्यावर save करावा. झाले नवीन पान तयार!

२. शोध करून. ज्या शब्दावर लेख लिहायचा आहे तो 'शोध' केल्यास तत्संबंधित लेखांचे मथळे येतील. त्याबरोबर 'No page with this exact title exists, trying full text search.' असेही एक वाक्य येईल (अर्थात, जर एखादा लेख आधिच लिहीला गेला असेल तर तोच येईल व हे वाक्य येणार नाही.) त्यातील this exact title वर टिचकी देताच ईच्छित शब्दावरील लेख लिहीता येईल.

आशा आहे या माहितीचा उपयोग होऊन तुमच्याकडूनही मराठी विकि मध्ये मोलाची भर पडेल!

जर अजून काही प्रश्न असल्यास विकिपीडिआ चावडीवर विचारावा.

नवीन लेख लिहीण्याचा सोपा उपाय

[संपादन]

विकिपीडिआमध्ये नवीन लेखांची भर घालणे आता अधिक सोपे झाले आहे. त्यासाठी खालील रिकाम्या पृष्ठपेटीमध्ये तुम्हाला अपेक्षित लेखाचे नाव लिहा आणि 'नवीन लेख बनवा' लिहिलेल्या कळीवर टिचकी द्या.



हे सुद्धा पहा

[संपादन]