विक्शनरी:चावडी/जुनी चर्चा १
विक्शनरी: आदर्श मांडणी क्रम
[संपादन]- विक्शनरी: आदर्श मांडणी क्रमबद्दल चर्चा करा.
Mahitgar 18:19, 4 December 2006 (UTC)
प्रबंधक नामनिर्देशन Administrator Nomination Poll
[संपादन]
- Nomination Request by User:Mahitgar in Marathi Language.:-
विकिपीडियन्स,
मी (User:Mahitgar) मराठी विक्शनरीचा Administrator होऊ इच्छितो. मी गेले काही महिने येथे नवीन लेख लिहिण्याचा, असलेले लेख संपादित करण्याचा व मराठी विकिपीडिया आणि विक्शनरी अधिकाधिक सुसंबद्ध करण्याचा प्रयत्न चालविलेला आहे.
मी मराठी भाषेचे व्याकरण या विषयाबाबतीत मराठी विकिपीडियावर भर घातली आहेच .येत्या काळात मराठी विकिपीडियास लागणार्या भाषांतरांच्या संदर्भात विक्शनरीच्या सहकार्याची मोठी गरज भासणार आहे. यासंदर्भात माझ्याकडे पुस्तकस्वरूपात पुरेशी संसाधनेही उपलब्ध आहेत.
मी मराठी विकिपीडियावर १००० पेक्षा अधिक संपादने पूर्ण केली आहेत.माझे मराठी विकिपीडियावरील योगदानाचे कार्य(My contributions on Marathi Wikipedia)
Administrator rights मिळाल्यास अधिक सुकर होईल. विकिपीडियाच्या नियमांनुसार मी विकि stewardsना माझी विनंती http://meta.wikimedia.org/wiki/Requests_for_permissions येथे करणार आहे. आता फक्त आपली (विकिपीडियन्सची)संमती मिळवायची आहे. तरी आपले मी Administrator होण्याबद्दलचे मत (होय/नाही)व त्याची कारणे दिल्यास माझ्या विनंतीवर stewards विचार करून होय/नाही उत्तर देतील.
आशा आहे की आपण लवकरच आपले मत Wiktionary:कौल येथेच खाली (stewardsच्या सोयीकरिता इंग्रजीत) नोंदवावे ही विनंती. क.लो.अ.
माहीतगार Mahitgar
अशुद्धलेखन सूचना/नोंद कक्ष
[संपादन]कृपया आपल्याला आढळलेले कोणतेही अशुद्धलेखन आपण स्वतः दुरूस्त करू शकता,किंवा या कक्षात नोंदवू शकता.नोंद लेखाचे नाव,लेखातील विभाग,वाक्य,शब्द,अशुद्ध व शुद्ध स्वरूपातील तफावत अशा क्रमाने असावी.आवश्यक नाही पण उपलब्ध असल्यास जमेल तेथे संदर्भ द्यावा. साधारणतः इतर काही मते येतात का पाहून दुरूस्ती सूचना अंमलात आणली जाईल.
सदुरूस्त नाही तर दुरुस्त(रु पहिली) २)जकरु नाही तर करू ३) कक्षात् नाही तर कक्षात. ४) स्वल्पविरामानंतर फक्त एका अक्षराची जागा सोडावी.५)आमलात नाही तर अंमलात.६) साधारणता नाही तर साधारणतः .
बहुभाषिक शब्दकोशाच्या दृष्टीने वर्गीकरण
[संपादन]एखाद्या शब्दाच्या इतर भाषांतील समानार्थी शब्दांचे लेख तयार करून त्यांची योग्य वर्गवारी केल्यास आपल्याला बहुभाषिक शब्दकोश आपोआप तयार करता येतील उदा. 'माणूस' या शब्दाचा जर्मन अर्थ [Mann]] असा लिहिताना तो लेख तयार करून 'Category:जर्मन नामे' या वर्गात टाकला तर अशा लेखांचा मिळून 'मराठी-जर्मन' शब्दकोश होऊ शकेल. सध्या मुखपृष्ठावर मराठी आणि इंग्लिश शब्दकोशांच्या चौकटी दिसत आहेत. तशा इतर भाषांच्या सुविधाही देता येतील. याबाबत इंग्लिश विकिपीडियाने सुरुवात केली आहे; त्यांच्या कामाचा संदर्भ म्हणून आपणास वापर करता येईल.
--संकल्प द्रविड 12:54, 5 जानेवारी 2007 (UTC)
- संकल्प, आपल्या मताशी सहमत आहे, हे सुद्धा काम करावयास हवे आहे.
- इंग्रजी विक्शनरीत काही नवीन उपयोगी नामविश्व (नेमस्पेसेस)पण वापरली जात आहेत असे माझ्या लक्षात आले.
- इंग्रजी विक्शनरीतील साचेपण उपयुक्त आहेत त्यांचे मराठीकरण करावयास लागेल, या दृष्टीने तुम्ही काही कामे केली आहेत असे दिसते; उदाहरणादाखल आपण एखादा साचा वापरून दाखवला तर मला शिकणे सोपे जाईल म्हणून विनंती.
- लास्ट बट नॉट द लीस्ट! मराठी विक्शनरीचे बहुसंख्य सदस्य मराठी विकिपीडियातूनच येणार आहेत त्या दृष्टीने मराठी विकिपीडियाच्या "अलीकडील बदल" या विशेष पानावर मराठी विक्शनरीचा दुवा लौकरात लौकर द्यावा ही विनंती.
-Mahitgar 14:59, 5 जानेवारी 2007 (UTC)
विभक्ती साचे, नवीन साचेनिर्मिती
[संपादन]माहितगार, अन्य विक्शनरीकरहो,
नामांच्या विभक्तीरूपांचे लेखन करण्याकरता सोय म्हणून मी mr:साचा:विभक्ती हा साचा बनवला आहे. हा साचा सामान्यनामे/विशेषनामे/सर्वनामे प्रकारांतील शब्दांच्या लेखात वापारावा अशी माझी विनंती आहे. या साच्याच्या वापरामुळे अशा सर्व लेखांच्या विभतीरूपे दर्शविणार्या टेबलांच्या मांडणीत एकवाक्यता राहील.
सध्या या साच्याचा look & feel अतिशय साधा आहे, तो काही दिवसांतच आकर्षक व इतर साच्यांच्या रंगसंगतीशी सुसंगत करायचे प्रयत्न करीन.
--संकल्प द्रविड ०६:०४, २७ मार्च २००७ (UTC)
वर्गीकरणाबद्दल
[संपादन]विक्शनरीकरांनो, सध्या मराठी विक्शनरीवरील बरेच लेख अवर्गीकृत आहेत. त्यांचे यथायोग्य वर्गीकरण करणे आवश्यक आहे, कारण अश्या प्रक्रियेने सर्व नोंदी यथायोग्य, शिस्तबद्ध स्वरूपात संकलित होत जातील. वर्गीकरणाकरता सुरुवात म्हणून काही प्रकार आपल्याला अवलंबता येतील:
- व्याकरणानुसार वर्गीकरण - शब्दाच्या व्याकरणविषयक गटानुसार त्याला योग्य तेथे वर्ग करावे.याकरता तूर्तास ढोबळ वर्गीकरणाचा निकष लावून 'मराठी नामे', 'मराठी क्रियापदे', 'मराठी विशेषणे' वगैरे वर्ग वापरले तरी चालेल. उदा. मुंगी या शब्दाचे वर्गीकरण सध्या मराठी नाम या वर्गात केले आहे.
- अंत्याक्षरानुसार वर्गीकरण/ आद्याक्षरानुसार वर्गीकरण - शब्दाच्या अंत्य/ आध्य अक्षरानुसार वर्गीकरण. यात शेवटच्या अक्षरास 'कारान्त मराठी शब्द' हा प्रत्यय लावून वर्ग करावा. उदा., मुंगी हा शब्द वर्ग:गीकारान्त मराठी शब्द या वर्गात मोडेल. तसेच, ग्राहक, अंमलबजावणी, अकल्पित हे शब्द अनुक्रमे वर्ग:ककारान्त मराठी शब्द, वर्ग:णीकारान्त मराठी शब्द, वर्ग:तकारान्त मराठी शब्द या वर्गांत मोडतील.
या सोप्या मार्गाने सुरुवातीस वर्गीकरण सुरु करावेसे वाटते. सध्या, या दृष्टीने मी सुरुवात केली आहे. इतर सदस्यांनी आणि प्रबंधकांनी याबद्दल आपली मते मांडावीत. तसेच, हे काम करण्यासंदर्भात इच्छुक लोकांनी एकत्र समन्वय साधावा, जेणेकरून हे काम गतीने पुढे सरकेल.
--संकल्प द्रविड १९:१६, ७ एप्रिल २००७ (UTC)
- आपण सुचवलेले वर्गीकरण ठीक आहे.अंत्याक्षरानुसार वर्गीकरण मध्ये वर्गीकरणांचे शेवटी येणार्या स्वरोच्चारानुसार सुद्धा वर्गीकरण करता येईल.
Mahitgar १६:०९, १४ एप्रिल २००७ (UTC)
Yes I am around
[संपादन]नमस्कार , का बरे सगळ्यांचे या मराठी विक्शनरीकडे दूर्लक्ष होत आहे. मी मोठ्या आशेने विक्शनरीला भेट देऊन फूल ना फूलाची पाकळी योगदान करतो.
मंडळी, इथे भेट दिल्या नंतर दोन शब्द लिहीलेत तर उगाच एकटे पडल्यासारखे वाटणार नाही एकमेकांना.
आपला
Mahitgar १५:१८, २१ मे २००७ (UTC)
जरूर विचार व्हावा अशी एक महत्त्वाची सूचना
[संपादन]मराठी विक्शनरीच्या विकासासाठी काही जणांकडून अतिशय तळमळीने प्रयत्न होताना पाहून समाधान वाटत आहे. परंतु त्याच वेळेस हे देखील तेव्हढेच खरे आहे की, अजून मोठा टप्पा गाठायचा आहे.
मुळात वेगवेगळ्या भाषेतील विक्शनरींच्या विकासाचा वेग वेगवेगळा आहे. काही भाषांतील विक्शनरींमध्ये शब्दसंख्या खूप वाढलेली आढ़ळते तर काहींमध्ये शब्द अद्याप थोडेच आलेले असले तरी प्रत्येक शब्दाची भरपूर व शास्त्रशुद्ध माहिती ठेवलेली आहे. महत्त्वाचा मुद्दा म्हणजे प्रत्येक विक्शनरीमध्ये येणार्या प्रत्येक शब्दासाठी भाषांतरे पुरेशा भाषांमध्ये देता आलेली नाहीत, जो की कोणत्याही डिक्शनरीचा प्राथमिक उद्देश असतो. वर उल्लेखलेल्या तीनही मुख्य उद्दीष्ट्यांच्या पूर्तीत असलेल्या अडचणी देखील लक्षात येण्यासारख्या असल्या तरी द्रुतगतीने सर्वच भाषांतील विक्शनरींमध्ये प्रगती व्हावी म्हणून काही सूचना प्रस्तावित कराव्या वाटतात.
प्रथम म्हणजे सर्व मुख्य भाषांतील विक्शनरीच्या तळमळीच्या संपादकांमध्ये व प्रबंधकांमध्ये सुनियोजीत समन्वय साधता लागेल. यासाठी 'common communication language' अर्थात 'सामायिक संपर्क भाषा' म्हणून एखाद्या भाषेची निवड करावी. या निवडी मध्ये प्रांतियता वगैरे न आणता माझ्या मते इंग्रजी भाषेला निवडता येईल. कारण बहुतेकांना इंग्रजी चांगल्याप्रकारे येते अथवा येत नसल्यास भाषांतर माध्यम मिळवता येते. म्हणजे 'क्ष' व 'य' या दोन भाषेतील दोन विकीपिडियन्स 'क्ष' ते इंग्रजी ते 'य' तसेच 'य' ते इंग्रजी ते 'क्ष' अशा प्रकारे संवाद साधू शकतात. त्यामुळे इंग्रजी विक्शनरीला मुळ विकासस्थळ म्हणून निवडता येईल.
त्यानंतर दररोज अथवा दर आठवड्याला अथवा दर पंधरवाड्याला असा एक काळ नियोजीत करून सगळ्या भाषेतील समन्वयकांनी निदान एक शब्दाचे इंग्रजी विक्शनरीत अर्थात मुळ विकासस्थळावर त्यांच्या त्यांच्या भाषेत भाषांतर नोंदवावे. उदाहरणार्थ, समजा आजचा शब्द 'interest' असा ठरला असेल तर प्रत्येक समन्वयकाने आपापल्या भाषेत त्याचे अगदी नेमके भाषांतर नोंदवावे. मराठी समन्वयक 'आवड', 'स्वारस्य' ही माहिती ठेवेल तर हिंदी जाणणारा 'पसंद' ही. पण भाषांतर हे अगदी नेमके असावे. सर्वच भाषांतील निदान पाच वाहून घेतलेल्या समन्वयकांना या प्रकल्पासाठी निमंत्रित करण्यात यावे, जेणे करून एखाद-दोघे एखाद्या वेळेस व्यस्त असल्यास कोणी ना कोणी त्या भाषेचे काम ठरलेल्या वेळेत पुढे नेईल.
त्याचबरोबर दुसरा टप्पा असा असावा की, दुसर्या दिवशी अथवा दुसर्या आठवड्यात सोयीप्रमाणे प्रत्येक समन्वयकाने आपापल्या विक्शनरीत आपल्या भाषेतून त्या शब्दाचे पान तयार करावे अथवा पूर्वीच तयार असल्यास ते संपादित करावे. या टप्प्यात प्रत्येकाला इंग्रजी विक्शनरी स्थळातून महत्तम भाषांतरे मिळतील व ती अधिकृत असण्याची सर्वोत्तम अपेक्षा करता येईल. या भाषांतरांसोबतच मग अधिकची माहिती प्रत्येक भाषेतील स्वरूपाप्रमाणे टाकता येईल.
या मार्गाचे दोन मुख्य उपयोग असे वाटतात की, सगळ्याच भाषेतील विक्शनरींचा सोबतच सारखा व चांगला विकास होईल व भाषांतरांमधिल अधिकृतता वाढवता येईल.
कृपया या सूचनांचा विचार व्हावा.
मराठी विक्शनरी च्या समन्वयकपदासाठी mahitgar, संकल्प द्रविड आदी तळमळीचे लोक आहेत. मी स्वतः काम करण्यासाठी उत्सूक आहे. आपल्याला इतर प्रत्येक भाषेतील तळमळीचे लोक शोधावे लागतील व सर्वांना एकत्र प्रयत्न करावे लागतील जेणे करून प्रत्येक विक्शनरीला महत्तम पूर्णत्वाकडे नेण्याचे प्रयास करता येतील. असे लोक शोधणे अवघड आहे हे अगदी मान्य परंतु जर मराठीत वर उल्लेखलेले लोक आहेत तर इतर प्रत्येक भाषेत असतील अशी आशा ठेवू व पुरेसा वेळ लागला तरी प्रथम नियोजितपणे एकत्र येऊ. मला सर्व म्हणजे 'सर्व' भाषा अपेक्षित आहेत. भले त्यासाठी सुरूवात करायला वेळ लागला तरी चालेल; पण सर्व भाषातील काही जण तरी एकत्र येऊया व आणूया. त्यासाठी वेगवेगळ्या विक्शनरीतील संपादनांचा इतिहास पाहून निवड करून चांगल्या लोकांना एकत्रित कामात सहभागी व्हाययाची offer द्यावी लागणार आहे.
मी या बाबतीत सगळ्यांची, विशेषतः mahitgar, संकल्प द्रविड आदी तळमळीच्या लोकांची मते जाणून घेण्यास उत्सूक आहे. कृपया चर्चा व्हावी. माझ्या सहभागाचा प्रस्ताव कायम तुमच्यासमोर असेलच.
--- श्रीहरि.
- आपली सूचना चांगली आहे लौकरच सविस्तर उत्तर लिहीन
Mahitgar १५:४५, ३० जून २००७ (UTC)
सर्व भाषांची यादी आवश्यक
[संपादन]मराठी विक्शनरीवर एखाद्या पानावर सर्व भाषांची यादी पुढीलप्रमाणे ठेवावी. ही यादी भाषांतरे देताना अतिशय उपयुक्त होईल. तसेच ही यादी योग्य क्रमात मांडावी. मराठी भाषेतील अक्षरांच्या क्रमाने ही यादी आल्यास सोयिस्कर होईल.
* भाषेचे नाव मराठीच्या देवनागरी लिपीत (कंसात भाषेचे नाव त्याच भाषेच्या मुळ लिपीत)
मी सर्व भाषांची यादीअसे एक पान सुरू करत आहे. ज्यांना इतर भाषा व त्यांची मुळ नावे माहीत आहेत त्यांनी त्यांची भर टाकावी. सर्वांनी भाषांतरे देताना तयार यादीचा उपयोग करावा.
श्रीहरि ११:४१, ५ जुलै २००७ (UTC)
शब्दकोशस्रोतांची आवश्यकता
[संपादन]नमस्कार,
मराठी विक्शनरीसाठी निदान काही भाषांची हव्या त्या स्वरूपात यादी विक्शनरी: सर्व भाषांची यादी येथे तयार आहे. यात सध्या जरी दीडेकशेच भाषा असल्या तरी एकूण ज्ञात अशा सुमारे २००० भाषांसाठी कालानुक्रमे चांगली भर पडत जाईल अशी आशा आहे.
आता गरज आहे ती चांगल्या शब्दकोशांच्या संसाधनांची. तसे 'इंग्रजी ते जगातील कोणतीही भाषा' वा उलटदिशीय अशा स्वरूपातील शब्दकोश जगभरातील दुकानात कोठे ना कोठे सापडूनच जातील. परंतु आपल्याला विक्शनरीला सर्वात अधिकृत, नेमकी व विश्वसनीय प्रकारे घडवायचे असल्यास अगदी नेमकी प्रमाणित भाषांतरे देणार्या अशा प्रकाशनांकडे व इतर स्रोतांकडे वळावे लागणार आहे.
माझी या संदर्भातील आधीची सूचना वाचकांच्या लक्षात असेलच. आपल्याला सर्व भाषीय विक्षनरींच्या समन्वयकांचा एक गट करून या कामाला गती देता येईल. परंतु सर्व भाषेतील अशा थोड्या लोकांना एकत्र आणण्याचे काम चुटकीसरशी होण्यासारखे नाही. तरी प्रबंधक पदावरील व्यक्ति त्यासाठी पुढाकार घेत असाव्यात, अशी आशा ठेवून आहे.
आपल्याला अधिकचे स्रोत म्हणून पुस्तकरूपात प्रकाशित शब्दकोश आणि माहिती-महाजालावरील युनिकोडआधारीत शक्यतो डाऊनलोडेबल आणि नाहीच तर निदान ऑनलाईन अनेकभाषीय शब्दकोश लागणार आहेत. आता आपण अशा स्रोतांच्या संदर्भाची एक यादी विक्शनरी: शब्दकोशस्रोत या ठिकाणी ठेवूया. कृपया या स्रोतांमध्ये अधिकृत असलेल्या गोष्टींचाच अंतर्भाव करावा. केवळ यादी मोठी करण्यासाठी अथवा प्रत्येक भाषेचे निदान एक तरी प्रतिनिधीत्व व्हावे, इत्यादी कारणांसाठी सुद्धा अप्रमाणित असलेल्या स्रोतांची दखल घेणे टाळावे.
स्वतः इंग्रजी विक्शनरी एक असा स्रोत होऊ शकते. परंतु माझ्या अनुभवानुसार तेथील काही भाषांतरे खरच नेमकी सापडली नाहीत. त्यामुळे इंग्रजी विक्शनरीच्या पडताळ्यासाठी दोन पर्याय राहातात. एक म्हणजे पूर्वीच सुचविलेला 'समन्वय प्रकल्प' अन्यथा अथवा त्यासोबतच इतर प्रमाणित शब्दकोश.
कृपया अशी संसाधने शोधून विक्शनरी: शब्दकोशस्रोत येथे मांडण्याच्या कामात हातभार लावावा.
श्रीहरि १२:२३, ६ जुलै २००७ (UTC)
- श्रीहरि आपली सुचना मला चांगली आहे माझ्याकडे उपलब्ध शब्दकोशांची माहिती मी त्यात जरूर भरेन . पण जाता जाता एक तांत्रिक कारणामुळे विनंती आहे की नामविश्वात Wiktionary: हे नामविश्व इंग्रजीतच आहे. आपण काही लेखांची सुरवात विक्शनरी:अशी केली तर एकतर जेव्हा मूळ Wiktionary: चे मराठीकरण होईल तेव्हा विक्शनरी: पासून सुरू होणारे लेख मिटवले जाण्याचा तांत्रिक धोका आहे.विकितील नामविश्व या संकल्पनेबद्दल थोडी माहिती करून घेण्याचा थोड प्रयत्न करावा समन्वयक म्हणून काम करताना निश्चित ऊपयोगी पडेल.
Mahitgar १५:३४, ६ जुलै २००७ (UTC)
महत्त्वाची घोषणा आणि योगदानाचे आवाहन
[संपादन]VERY IMPORTANT ANNOUNCEMENT AND APPEAL FOR CONTRIBUTIONS
Hello all wikipedians, wiktionarians, and other wikiens,
First, let me congratulate you all for your interest in sharing the knowledge through the platform of wiki projects, like wikipedia, wiktionary, wikibooks, wikimedia etc.
In an effort to foster the parallel growth of multilingual dictionary projects of wiktionary in all languages available, we have come out with a concurrent development plan. Participation of dedicated knowledgeable wikiens from all languages is expected in this ambitious step. The detailed plan is as follows:
- The common knowledge-sharing site is decided to be of English wiktionary at the web address http://en.wiktionary.org.
- Daily some quantity of words, to begin with say one (1), would be selected, in English language. Experts from each language should go to English wiktionary site every day and provide extensive and most accurate translations of selected words from English wiktionary into their own language. In due period of time, when we start receiving contributions from all languages at regular rate, the target of number of words per day would gradually be increased. For the moment practically it is kept just one (1).
- The form of translation that an expert of a language, say xyz, should provide is like:
- English name of the xyz language in English script (original name of the xyz language in xyz script) : translation of word in xyz language in xyz script (pronunciation of this translation in English script ); translation of word in xyz language in xyz script (pronunciation of this translation in English script ); translation of word in xyz language in xyz script (pronunciation of this translation in English script ), ...
- For example, if one of today’s words is ant, experts would go to the page of ant in English wiktionary and update in the following manner. French experts would place the following entry on the page on ant.
- French (Français) : fourmi (formi)
- Russian experts would do it in the following way:
- Russian(Русский) : муравей (muravéj)
- And so on.
- The translations must occur in the format as specified.
- The languages should occur in the alphabetically ascending manner. For example, French entry would come prior to Russian entry.
- If translations in your language for that word already exist on English wiktionary, you are requested to check their accuracy and exactness. If they are accurate and exact, it is very fine or else they should be accordingly corrected.
- Please do not mix translation with different meanings at same place. If the same word in English has two meanings, we would be constructing two different tables on the same page and each meaning of the word should go in appropriate different table.
- Please give as many different translations in your language as possible. This would be enabling rich widespread of your languages on all wiktionaries by contribution at only one common development site of English wiktionary.
- The next activity is of multi-locations. What is expected is that after updating of all translations for a word on English wiktionary is over in specified period of one day, on the very next day, expert from all languages would be able to pick up these translations from English wiktionary common development site and copy-paste these on their own language wiktionary page for their language word. This would enrich English wiktionary in first go and all wiktionaries in parallel.
- If, due to some reasons, experts of one particular language, say xyz, are not able to provide translations for today’s selected words in specified period of 24 hours, then it is expected that they should clear this backlog at the earliest. As and when they provide these backlog translations on English wiktionary, they should necessarily make a note on special page http://en.wiktionary.org/wiki/Wiktionary:Requested_articles:English that these translations have been updated and are available for all others to copy-paste on their wiktionary sites. But, except in real short of time or other resources like net-connection availability, it would be of more pleasure to avoid such situations.
This is genuine appeal to all wiktionarians of all languages that do contribute on English wiktionary regularly as per plans. Your language would reach widely to all other languages and all other languages to your language. We can overcome extra burden of isolated efforts and reach maximum accuracy through well-planned efforts like this. Particularly, we appeal to the concerned various language wiktionary administrators to take care that their language doesn’t remain behind by supporting this Parallel Development Project.
The Project begins from 15th July 2007. All language persons kindly note and contribute regularly. The selected word in English would be declared on http://en.wiktionary.org/wiki/Wiktionary:Requested_articles:English one day prior for every day.
Thanking and once again expecting regular contributions from all in planned manner,
श्रीहरि १९:२४, ७ जुलै २००७ (UTC)
Compliments to मराठी विक्शनरी सदस्य श्रीहरि
[संपादन]- Compliments to मराठी विक्शनरी सदस्य श्रीहरि is now a sysop (administrator) on Marathi Wiktionary,Marathi Wiktionary looks forward to your continued support.
Mahitgar १०:३३, १६ सप्टेंबर २००७ (UTC)
ध्वन्यात्मक देवनागरी लिपी
[संपादन]प्रबंधक माहितगारांनी ध्वन्यात्मक देवनागरी लिपीत लिहिण्याची सोय मराठी विक्शनरीत उपलब्ध करून दिल्याने ज्यांच्याकडे देवनागरी बराहासारखे उत्कृष्ट IME's नाहीत किंवा ते असलेतरी त्यांच्या वापरासाठी लागणारी विंडोज २००० वा त्यापुढची संगणकप्रणाली नाही व जुन्या प्रणालींवरच काम चालते, त्यांची फारच मोठी सोय झालेली आहे त्याबद्दल माहितगारांचे आभार.
माहितगारांनाच यासंदर्भात अजून एक विनंती आहे.
सध्याच्या ध्वन्यात्मक देवनागरी लिपीत पूर्ण विराम हा . असा न येता तो हिंदीतील पूर्णविरामाप्रमाणे । असा येतो. तो कदाचित हिंदीतून ही प्रणाली घेतल्यामुळे येत असावा, पण मराठीसाठी आपल्याला तो . असाच हवा आहे. तो तसा करता आल्यास जरूर करावा, ही विनंती.
किंबहूना हे साध्य करण्याची पद्धत मला कळवल्यास मी असे थोडेफार बदल करून या ध्वन्यात्मक देवनागरी लिपीला बराहाप्रमाणे अगदी नैसर्गिक करून ठेवू इच्छितो, ते करता येईल.
श्रीहरि ०८:०५, २१ सप्टेंबर २००७ (UTC)
- विकिपीडियाशी संबधीत मराठी , हिंदी, आणि नेपाळ भाषा संस्करणांमध्ये ध्वन्यात्मक देवनागरी लिपीचा उपयोग केला जात आहे हे संस्करण मुलतः देवनागरी नसलेल्या संस्करणांवरून तयार केले गेले होते, आधी आपण हे संस्करण नेपाळभाषा संस्करणास जोडले होते,तदनंतर मराठीच्यासोयीच्यादृष्टीने हिंदी विकिपीडियातील संस्करणाशी जोडले पण त्या मुळे काही प्रश्नही निर्माण झाले त्यातले काही हिंदी विकिपीडियातील संपादकांनी दुरूस्तही केले । या संस्करणांमध्ये जावा स्क्रिप्ट या तांत्रिक प्रणालीचा उपयोग केला जातो| या सर्व संसदर्भात नेपाळभाषअ प्रबंधक यूकेश यांनी वेळोवेळी मोलाची मदत केली आहे। मराठी संस्करणाची आवृत्ती संपूर्ण स्वतंत्र असावी यादृष्टीने काय करावे व कोणती फाईल चढवावी याचे त्यांनी मार्गदर्शन देऊ केले आहे।
या स्वतंत्रीकरणास मी अजून हात न लावण्याची तीन कारणे आहेत जसे की
- जावा स्क्रिप्ट हा वेबसाईट सुरक्षेच्या दृष्टीने नाजूक विषय आहे त्यात विश्वासार्ह मराठीच तज्ञाचे मार्ग दर्शन असलेले आणिअ सतत लक्ष असलेले चांगले जे उपलब्ध व्हावे म्हणून मी छानसा हातावर हात धरून बसलो आहे।
- दुसरे काही गोष्टी तत्संबधी संचिकेत नेमक्या कुठे घडतात हे मला व्यवस्थीत उमगलेले नाही , जसेकी पूर्णविराम आणि जोडाक्षरे ।
- त्या शिवाय कळफलक इतर कोणताही जसेकी गमभन, बराहा,गूगल , मनोगत यातील कुणासही वेगळा वाटूनये यूनिफॉर्मिटी असावी, तसेच सतत कळफलक वापरून इतरही अडचणीची नोंद करावी व संपूर्ण अडचण विरहीत कळफलक अस्तित्वात यावा असे वाटते। पण या करिता सध्याचा कळफलक किमान काही कालावधीकरिता वापरून जिज्ञासूनी सूचना मांडावयास हव्यात । माझ्याशिवाय इतरकुणी वापरत असेलतर हीमेहनत घ्यावी असे मलाही वाटणे सहाजीक आहे म्हणूनही तुमच्या प्रमाणेच इतरही तक्रारी याव्यात म्हणुनही वाट पहात आहे। कुणी अडचण सांगितली तर सोयीचा उपयोग होतो आहे हे कळते आणि मेहनत कुणाला कामाला आली की अजून काम करावेसे वाटते।
- जिज्ञासूंनी कॄपया Help:Editing या पानाचा तसेच
धूळपाटी कळफलक दुरूस्ती [Monobook JS from Hindi wikpedia for कळफलक ] [[१]] चा अभ्यास करावा तसेच पुढे कोणत्या तांत्रिक बदलाने हे स्वतंत्रिकरण पूर्ण होणे शक्य आहे याची माहिती [सद्स्य यूकेश यांचे योगदान आणि मार्गदर्शन अभ्यासताना मिळते। कृपया विषयावर मूख्य बदल घडवण्या अगोदर अजून थोडीतरी चर्चा करावी
धन्यवाद Mahitgar १५:३४, २१ सप्टेंबर २००७ (UTC)
- मराठी विकिपीडियावर असा प्रयोग कोल्हापुरी यांनी यापूर्वीच यशस्विरीत्या केला होता. ["मराठी जावास्क्रिप्ट लिप्यंतर"] या मथळ्याखाली यावर चावडीवर १६ डिसेंबर ०६ रोजी चर्चाही झाली होती. काही कारणास्तव ती सुविधा एकाच दिवसात काढून घेण्यात आली. कोल्हापुरी यांना याची सर्व तांत्रिक माहिती असावी असा माझा अंदाज आहे. त्यांच्याशी संपर्क साधून यातून काही मार्ग काढता येईल का ते पाहावयास हवे.
- ----Shantanuo
I recreated mediawiki file MediaWiki:Pagecategories after getting advice to that effect from english wiktionary's technical discussion room. But I have not still fully realised complete technical reason why was this problem at all did arise ?
Any way to fieght out such problems best way is
- Cross fingers and spend time on other activities untill marathi wiki gets a java knowing Marathi persons active online support and contribution.
- One more solution I have written about the same to become member of Your contribution here [२] can help Marathi Shuddhalekhan at all Marathi Wikiprojects in one go.
Thanks and Regards Mahitgar १३:२२, २२ सप्टेंबर २००७ (UTC) Your contribution here [३] can help Marathi at all Marathi Wikiprojects in one go.
Thanks and Regards Mahitgar १३:२२, २२ सप्टेंबर २००७ (UTC)
प्रबंधक माहितगार,
Category:xxxx चे अगदी तातडीने वर्ग:XXXX केल्याबद्दल आभार. आता हे अगदी नैसर्गिक दिसत आहे.
पण हे साध्य कोठून केले ते मला कळले तर बरे होईल. कारण आपण मार्गदर्शन केलेल्या दुव्यांवर केवळ भाषांतरांची चर्चा होती, ते साध्य करण्यासाठी काय व कोठे म्हणजे कोणच्या File मध्ये काय फरक करायचा वगैरे मला कळल्यास उपयोग होईल. तरी हे देखील सांगण्याचे अवश्य करावे, अशी नम्र विनंती.
बाकी असेच अजून काही मुद्दे आपल्याशी चर्चा करायला मनात ठेवून आहे. ते देखील सांगत जाईन. आपले असेच मार्गदर्शन व सहकार्य अपेक्षित आहे.
श्रीहरि १२:००, २४ सप्टेंबर २००७ (UTC)
मदतीचा लेख
[संपादन]मदतीचा लेख हा लेख मुखपृष्ठावरून दूवा देऊन बराच पुर्वी (मागे) लिहीला गेला आहे। सद्स्य श्रीहरी यांनी नवे नमुना लेख साचे बनवले असताना या मदतीचा लेखलेखाचे काही प्रयोजन शिल्लक आहे काय, तसे नसेल तर हा लेख वगळावा किंवा काही दुरूस्ती करावी या बद्दल विक्शनरीकरांनी आपली मते मांडावीत Mahitgar १५:१६, ११ ऑक्टोबर २००७ (UTC)
मदतीचा लेख या लेखाचे आता आहे त्या स्वरूपात काहीही प्रयोजन राहिलेले नाही. तो लेख अगदी सर्वसामान्य, म्हणजे सरसकट सगळ्या शब्दांसाठी, आहे व शब्दप्रकाराप्रमाणे त्यात fields नाहीत. त्याऐवजी आता तयार होत असलेले आठ शब्दप्रकारांप्रमाणे असलेले लेख अगदी नेमके करायचा प्रयत्न चालू आहे.
मदतीचा लेख न वगळता त्यातील मजकूर भिन्न ठेवता येईल. सध्या तो मजकूर पूर्णपणे बदलत असून तेथे आठ नमुना साचा लेखांचे दुवे ठेवत आहे. सध्यापुरते हे ठीक राहिल.
श्रीहरि ०९:२३, १२ ऑक्टोबर २००७ (UTC)
- धन्यवाद
Mahitgar १४:२९, १२ ऑक्टोबर २००७ (UTC)
मदतीचा लेख प्रमाणेच आता विक्शनरी: आदर्श मांडणी क्रम या लेखाचेही आहे त्या स्वरूपात काही प्रयोजन राहिलेले नाही, असे वाटते. कारण आपण अगदी नेमके असे ८ नमुना साचे लेख तयार करण्याच्या प्रक्रियेत आहोत. त आपली मते नोंदवल्यास विक्शनरी: आदर्श मांडणी क्रम हा लेखही थोडा बदलता येईल.
श्रीहरि ०७:३७, १३ ऑक्टोबर २००७ (UTC)
- जरूर बदलावा। मलाही इतर शब्द प्रकारा सध्याच्या स्वरूपा बद्दल अडचण जाणवत होती । शब्द प्रकारानुसार नमुना मंडणीक्रम हि कल्पना सरस आहे। विक्शनरी: आदर्श मांडणी क्रम मध्ये आपण तयार केलेले नमुना लेख कसे वापरावेत आणि मदतीचा लेख मध्ये इतर संपादन सहाय्य कदाचित उअपलब्ध करता येईल । आपण या लेखात बदल केल्या नंतर मी थोडा फार साहाय्य दृष्टीकोणातून विस्तारीकरणास हातभार लावेन।
Mahitgar ०९:०८, १३ ऑक्टोबर २००७ (UTC)
NavFrame मूळ आकर्षक स्वरूपात येत नाही
[संपादन]विकिपीडियामध्ये NavFrame[४] हा एक अत्यंत उत्कृष्ट वर्ग (class) उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. तो मराठी विक्शनरीत वापरू जाता, त्या मुळ स्वरूपात दर्शनी होत नाही जसा तो इंग्रजी विकिपिडीयामध्ये होतो.
मुळात NavFrame हा वर्ग हा एक धारक वर्ग (Container class) असून इतर मजकूर धारण करण्याची त्याची क्षमता आहे. याचे अधिकचे वैशिष्ट्य म्हणजे यातील घटक लपवता येतात वा दाखवता येतात. म्हणजे जागेच्या उपलब्धतेप्रमाणे व वैयक्तिक गरजेप्रमाणे त्यांना दृश्य वा अदृश्य ठेवता येते. जणू आपण त्यातील घटकांची घडीच करून ठेवत आहोत. त्यामुळे विक्शनरीत आम्ही तो विस्तृत प्रमाणात वापरू इच्छितो. परंतु असणारी एकच अडचण म्हणजे इंग्रजी विकिपिडीयाप्रमाणे येथे तो आकर्षक मूळ स्वरूपात येत नाही. माहितगार तसेच इतर तज्ज्ञ मंडळी मार्गदर्शन करू शकली तर मराठी विक्शनरीतील दृश्य भाग देखणा करण्यास हातभार लागेल. समस्येच्या समाधानाची वाट पाहात आहे.
श्रीहरि ०६:५१, १५ ऑक्टोबर २००७ (UTC)
Sitenotice
[संपादन]The English in the sitenotice is not correct. Please update it to read: "Please bear with us while some technical features are updated. If you have difficulties, you can get help at Discussion room Mike.lifeguard | @meta"