विक्शनरी:सजगता
हे सदर खालीलपैकी कुठलीही एक माहिती दर्शविते:
येथे टिचकी मारून मराठी विक्शनरी करिता आलेल्या लोगो प्रस्तावावर चर्चा करा
Discuss logo proposal for Marathi Wiktionary
- शीर्षक संकेत- मराठी शब्द,वाक्य,वाक्प्रचार यांच्या संज्ञा लेखांखेरीजचे सर्व लेख जसे विक्शनरी प्रकल्प ,साहाय्य इत्यादी विषयक लेख Wictionary:लेखाचे नाव किंवा Help:लेखाचे नाव आवश्यक समजावे.
- लेखनप्रसिद्धीपूर्व शुद्धलेखनाची तपासणी जरूर करून घ्यावी. सध्या ही सुविधा फक्त शंतनु ओकांचे फायरफॉक्स ऍड-ऑन , गमभन शुद्धिचिकित्सक आणि मनोगतात असल्यामुळे गमभन शुद्धिचिकित्सक आणि मनोगत शुद्धिचिकित्सकाचा उपयोग आवर्जून करावा .
- शुद्धलेखनाबद्दल खात्री नसलेल्या व्यक्तींनी आधी लेखन Wiktionary: शुद्धलेखन मदत येथे करावे. तिथे चिकित्सकांनी तपासून दिलेले लेखनच लेखात वापरावे.
- 'विक्शनरी' हे लेखन बरोबर आहे. 'विक्षनरी असे लेखन चुकीचे आहे.
- "Wiktionary" हे स्पेलिंग बरोबर आहे. "Wictionary हे स्पेलिंग चुकीचे आहे.
विक्शनरी:सजगता/7 मराठी विक्शनरी हा मराठी विकिपीडियाचा सहप्रकल्प आहे. येथून मराठी विकिपीडियाचा/लेखांचा दूवा द्यावयाचा झाल्यास चौकटी कसाच्या आत सुरवातीस :w: असे लिहावे.
विक्शनरी:सजगता/31 केवळ लकब म्हणून काही आठवेनासे झाले म्हणजे बोलण्यात पालुपदासारखे कधीकधी पुन्हापुन्हा येणारे केवलप्रयोगी अव्यय म्हणजे पादपूरणार्थ केवलप्रयोगी अव्यय होय.
विक्शनरी:सजगता/32 उद्गारासारखे वाटणारे, वाक्याच्या अगदीच आरंभी म्हणून नेहमी न येता मध्येही येणारे व वाक्याच्या अर्थात विशेष भर न टाकणारे केवलप्रयोगी अव्यय म्हणजे व्यर्थ उद्गारवाची केवलप्रयोगी अव्यय होय.
विक्शनरी:सजगता/33 पहिल्या (गौण) वाक्यातील अटीवर दुसरे (प्रधान) वाक्य अवलंबून आहे, याचा संकेत देणारे उभयान्वयी अव्यय म्हणजे संकेतबोधक उभयान्वयी अव्यय होय.
संकेतबोधक उभयान्वयी अव्ययांची काही उदाहरणे अशी: जर-तर, जरी-तरी, म्हणजे, तर, की.
विक्शनरी:सजगता/34 गौण वाक्य हे प्रधान वाक्याचा उद्देश किंवा हेतू आहे, हे सांगणारे उभयान्वयी अव्यय म्हणजे उद्देशबोधक उभयान्वयी अव्यय होय.
उद्देशबोधक उभयान्वयी अव्ययांची काही उदाहरणे अशी: म्हणून, यास्तव, सबब, कारण, की.
विक्शनरी:सजगता/35 गौण वाक्य हे प्रधान वाक्याचे कारण आहे, हे सांगणारे उभयान्वयी अव्यय म्हणजे कारणबोधक उभयान्वयी अव्यय होय.
कारणबोधक उभयान्वयी अव्ययांची काही उदाहरणे अशी: कारण, का की, कारण की, की.
विक्शनरी:सजगता/36 प्रधान वाक्याला गौण वाक्याशी जोडून त्याचे स्वरूप उलगडून सांगणारे उभयान्वयी अव्यय म्हणजे स्वरूपबोधक उभयान्वयी अव्यय होय.
स्वरूपबोधक उभयान्वयी अव्ययांची काही उदाहरणे अशी: म्हणजे, की, म्हणून, जे.
विक्शनरी:सजगता/37 जोडले जाणारे दोन शब्द अथवा वाक्ये सारख्याच दर्जाची नसून कोणी एक प्रधान तर कोणी एक गौण आहे, हे दर्शवणारे उभयान्वयी अव्यय म्हणजे गौणत्वसूचक उभयान्वयी अव्यय होय.
विक्शनरी:सजगता/38 दोनपैकी एका वाक्याचा परिणाम दुसर्यात दर्शवणारे उभयान्वयी अव्यय म्हणजे परिणामबोधक उभयान्वयी अव्यय होय.
परिणामबोधक उभयान्वयी अव्ययांची काही उदाहरणे अशी: म्हणून, सबब, याकरिता, यास्तव, तेव्हा, तस्मात, अतएव.
विक्शनरी:सजगता/39 दोनपैकी एका शब्दात अथवा वाक्यात उणीव, दोष वा कमीपणा असल्याचे सूचवून त्याच्या विरोधात दुसर्याचे समर्थन करणारे उभयान्वयी अव्यय म्हणजे विरोधदर्शक उभयान्वयी अव्यय होय.
एका गोष्टीचा दुसर्याच्या अपेक्षेत विरोध करताना बहुधा न्यूनत्व दाखवले जाते वा त्याचा बोध केला जातो, म्हणून विरोधदर्शक उभयान्वयी अव्ययाला न्यूनत्वबोधक उभयान्वयी अव्यय देखील म्हणतात.
विरोधदर्शक उभयान्वयी अव्ययांची काही उदाहरणे अशी: पण, परंतु, परी, बाकी, किंतु.
विक्शनरी:सजगता/40 दोन किंवा जास्त गोष्टींपैकी एका गोष्टीची अपेक्षा दर्शवणारे उभयान्वयी अव्यय म्हणजे विकल्पबोधक उभयान्वयी अव्यय होय.
विकल्पबोधक उभयान्वयी अव्ययांची काही उदाहरणे अशी: वा, की, किंवा, अथवा, अगर.
विक्शनरी:सजगता/41 दोन प्रधान शब्दांना अथवा वाक्यांना जोडणारे उभयान्वयी अव्यय म्हणजे समुच्चयबोधक उभयान्वयी अव्यय होय.
समुच्चयबोधक उभयान्वयी अव्ययांची काही उदाहरणे अशी: आणि, व, अन, शिवाय.
विक्शनरी:सजगता/42 विक्शनरी:सजगता/42
विक्शनरी:सजगता/43 विक्शनरी:सजगता/43
विक्शनरी:सजगता/44 विक्शनरी:सजगता/44
विक्शनरी:सजगता/45 विक्शनरी:सजगता/45
विक्शनरी:सजगता/46 विक्शनरी:सजगता/46
विक्शनरी:सजगता/47 विक्शनरी:सजगता/47
विक्शनरी:सजगता/48 विक्शनरी:सजगता/48
विक्शनरी:सजगता/49 विक्शनरी:सजगता/49
विक्शनरी:सजगता/50 विक्शनरी:सजगता/50
विक्शनरी:सजगता/51 विक्शनरी:सजगता/51
विक्शनरी:सजगता/52 विक्शनरी:सजगता/52
विक्शनरी:सजगता/53 विक्शनरी:सजगता/53
विक्शनरी:सजगता/54 विक्शनरी:सजगता/54
विक्शनरी:सजगता/55 विक्शनरी:सजगता/55
विक्शनरी:सजगता/56 विक्शनरी:सजगता/56
विक्शनरी:सजगता/57 विक्शनरी:सजगता/57
विक्शनरी:सजगता/58 विक्शनरी:सजगता/58
विक्शनरी:सजगता/59 विक्शनरी:सजगता/59
विक्शनरी:सजगता/60 विक्शनरी:सजगता/60
विक्शनरी:सजगता/61 विक्शनरी:सजगता/61